
दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा- शाम पुणेकर.
पुणे :
काल मध्यरात्री मुसळधार पावसामुळे लोणावळ्याजवळ एक मोठी दरड कोसळली. अप लाइनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद आहे. अप लाइनवरील वाहतूक मिडल लाइनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा थोडीसी सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाइन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.
लोहमार्गावर मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.