
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील सोनगिरी येथिल प्राथमिक शाळा मध्ये अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम राबवण्यात आले. गावात प्रभात फेरी काढण्यात आली.शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आले,अनेक लहान बालकांचे अत्यंत उत्तम प्रकारे भाषणे झाली, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत संपूर्ण इतिहास बालकांनी जनतेसमोर मांडला. सर्व बालकांना खाऊचे वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाचे नेते श्री. बाळासाहेब सोमनाथ कुटे,सौ शोभा कुटे, श्री दराडे सर, श्री ताटे सर,श्री पवार मॅडम, शेरकर मॅडम, उगलमुगले मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले .विशेष म्हणजे महिला शिक्षिका सौ शोभा यांच्या पुढाकाराने शाळेच्या परिसरात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.याप्रसंगी गावातील सर्व पालक,ज्येष्ठ नागरिक,तरुण वर्ग उपस्थित होता.
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून देशाच्या अमृत महोत्सवाच्या वेळी हर घर तिरंगा या अभियानाची सखोल माहिती तसेच परिसरात कशा पद्धतीने हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले.याची सविस्तर माहिती भगवान बांगर यांनी दिली. हा स्वातंत्र्य दिन अतिउत्साहात संपन्न झाला.