
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:-शंकरराव पाटील महाविद्यालय,येथे सांस्कृतिक विभाग आणि आयक्यूएसी वतीने व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ धालगडे सर व अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंदनशिव एस बी हे होते तसेच या कार्यक्रमासाठी प्रा.डी व्ही शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ ए एस जगदाळे, प्रा.गव्हाणे के जी, प्रा बोराडे टी आर, आयक्यूएसी समन्वयक प्रा डॉ एन डी पडवळ, प्रा सुरवसे जी एच हे होते.
यावेळी बोलताना “ज्या गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांना आवड आहे त्याच विषयामध्ये आपले करिअर घडवून आपला व्यक्तिमत्त्व विकास करून घ्यावा तसेच परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिक व बौद्धिक पातळीवर सदृढ होणे काळाची गरज आहे” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ तावरे मॅडम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा साठे सरांनी तर तांत्रिक सहाय्य प्रा कराळे, प्रा काळे, प्रा मांडोत मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी-विद्यार्थीनी तसेच सर्व प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.