
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम :-तालुक्यातील सोन्नेवाडी ईट , घाटनांदूर , सुकटा चिंचोली चिंचपूर ( ढगे ) या सह गावामध्ये सतत च्या पावसाने व निसर्गांच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या उभे असलेल्या पिकाचे नुकासान झाले असुन शेतकर्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हा शिवसेना सह संपर्क प्रमूख शंकर राव बोरकर यांनी प्रशासनास पंचनामे करून मदत मिळावी असे आदेश दिले आहेत.
येथील सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राजेनिंबाकर व बोरकर यांनी पाहणी करून तातडीने पंचनामे व निकष सर्वत्र लागू करून एसडीआरफ आणि एनडीआरएफ अंतर्गत सर्व पंचनामे करण्याबाबत संबंधित अधिकारी यांनी शेतकरी बांधवाना मदत होईल अशी भूमिका ठेवावी.शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी एप वर जीपीएस फोटो व सातबारा अपलोड करावे व सतत च्या पावसाने नुकसान झाले असल्याचा तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयात द्यावा व पोहच घ्यावी असे आवाहन केले.सोयाबीन पिकाचे गोगलगाय व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे.या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व शंकरराव बोरकर यांनी शनिवारी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली.कुठलेही निकष न लावता सरसकट अनुदान दिले जावे अशी मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हासहसंपर्क प्रमुख शंकर बोरकर, जिल्हा प्रमुख गौतम लटके , युवा जिल्हा आधिकारी डॉ चेतन बोराडे ,विधानसभा समन्वयक दिलीप शाळू, भूम -परांडा -वाशी विधानसभा प्रमुख प्रल्हाद आडागळे ,वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे, भूम तालुका प्रमुख अँड श्रीनिवास जाधवर , युवा सेना उपजिल्हा अधिकारी उमेश जाधव , युवा सेना तालुका आधिकारी बालाजी लाखे , उपविभागीय अधिकारी रोहिणी नर्हे ,भूम तहसिलदार उषाकिरण शृगारे ‘ तालुका कृषी अधिकारी एस एम गायकवाड , उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग मोहिते ए एन . भूम युवा तालुका आधिकारी सुधीर ढगे शेतकरी सेनेचे महादेव वारे . रफिक तांबोळी, विकास ढगे , केशव चव्हाण, श्रीमंत भडके, माजी शहर प्रमुख राम नाईकवाडी, उपतालुका प्रमुख अशोक वनवे ,शहर प्रमुख वाशी लायक तांबोळी, शहर प्रमुख अनिल गवारे,वाशी बाळासाहेब उंदरे ,तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले ,गट विकास अधिकारी राजगुरू व शेंदरे उप अभियंता यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.खासदार यांनी दौऱ्यादरम्यान नागरिकांनी सांगितलेल्या अडचणींची निवेदने स्वीकारून काही अडचणीवर त्वरित मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले त्यामुळे नागरिकांनी शेतकर्यानी समाधान व्यक्त केले.