
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
द्वारकाधीश दहीहंडीला उदंड प्रतिसाद
देगलूर : देगलूर बिलोली भाजपा विधानसभा अध्यक्ष दिगंबर कौरवार यांनी आयोजित केलेल्या द्वारकाधीश दहीहंडी उत्सवात लावणी सम्राट किरण कोरे व पूजा वाघमारे यांच्या अनोख्या अदाकारीने उपस्थित प्रेक्षक गण मंत्रमुग्ध झाले . या सोहळ्याला बालगोपाल, अबालवृद्धांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
सदरील दहीहंडी उत्सव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मुलांच्या प्रांगणात शुक्रवार दि. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, दिव्यांग आघाडीचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, संघटन मंत्री तथा माजी नगराध्यक्ष गंगाधरराव जोशी, मार्केट कमिटीचे सभापती अनिकेत पाटील राजूरकर, संचालक संतोष नारलावर , वस्त्रोद्योजक अविनाश कोटगिरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष नामदेव थडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
द्वारकाधीश दहीहंडी च्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट तथा लावणी सम्राट किरण कोरे व मुरंबा सिरीयल फेम पूजा वाघमारे यांनी दिलखुलास अशी लावणी सादर करून गोविंद भक्तांना भुरळून टाकले. त्यानंतर डीजेच्या दणादणाटावर चैतन्य आणि जल्लोषाच्या वातावरणात बालगोविंदा व गोपिकांनी
…. गोविंदा आला रे… गोविंदा आला … च्या जयघोषात दहीहंडी फोडण्याच्या उत्सवास प्रारंभ झाला आणि गोविंदा पथकाकडून थरावर थर मानवी मनोरे रचून सलामी देण्यात आली. सहभाग नोंदवलेल्या गोविंदा पथकाने जिकरीचे प्रयत्न करून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये नांदेडच्या ‘जय बजरंग बली’ वडारवाडा या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यात यशस्वी झाले. विशेष म्हणजे शहरात पहिल्यांदाच एवढी मोठी दहीहंडी पार पडली की, जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती त्यामुळे दोनशे ते तीनशे गोविंदा भक्तांनी शाळेच्या छतावर उभे ठाकून या देखणीय सोहळ्याची मजा घेतली. हा दहीहंडी उत्सव रात्री दहापर्यंत चालला तरीही महिला भगिनींची अलोट गर्दी कायम होती हे विशेष होय…!
गोजेगावकराकडून 51 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक //
भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्याकडून द्वारकाधीश दहीहंडी उत्सव समिती मधील विजेत्या गोविंदा पथकांना 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले होते त्यानुसार नांदेड येथील जय बजरंग बली वडारवाडा या विजेत्या गोविंदा पथकाला जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर ,संघटन मंत्री गंगाधर जोशी ,रामदास पाटील सुमठाणकर , आयोजक दिगंबर कौरवार , भाजपा तालुका उपाध्यक्ष नामदेव थडके यांच्या हस्ते 51 हजार रुपये देण्यात आले. //
हा दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी राहुल पेंडकर , किरण उल्लेवार , साई बोनलावार , विकास मोरे , योगेश राऊलवार , योगेश मैलागीरे, दिपक संगमकर,
मारोती पुलचुवाङ, तुकाराम बतकुलवार, सतीश जोशी, मधुकर पोलशेटवार, संतोष आगलावे, गिरीश जिल्हेवार, गजानन पापटवार, विजय कहलवार, नितीन दुप्पेवार गुरुप्रसाद चप्पलवार, राहुल आऊलवार, सुरज मामीडवार, संतोष नाईनवाड, नरेश गुडेवार बालाजी अनमुलवार, संदीप पाटील, नारायण गुंडावार, सुनील बोरगावे, दीपक बोधनकर, गजेंद्र नाईक, व्यंकटेश कुलकणी, प्रणय जोशी, ऋषिकेश येरणे, सचिन पांचाळ, संतोष मरतुळे, गंगाधर रणवीरकर, गणेश तिम्गलवार, बालजी थडके, तुकाराम यत्रावार, विनायक नागशेट्टीवार. आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहे. या आनंदोत्सवाला काही गालबोट लागू नये म्हणून पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस उपनिरीक्षक मुंडे, जमादार माधव पल्लेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.