
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: काल देगलूर शहरातील नागोबा मंदिर परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे जनरल स्टोअर्सचे रस्त्यावर ठेवलेले सामान बाजूला घ्या असे सांगणाऱ्या शरीफ जनरल स्टोअरचा मालक जमील व त्याचे दोन मुलांने एकाला लोखंडे रोडने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना दिनांक 22 रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यातील देगलूर शहरातील शरीफ जनरल स्टोअर्स जवळ घडली. शहरातील नागोबा मंदिराजवळ राहणारे राहुल अशोक देगावकर हे शिळवणी तालुका देगलूर येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आपली दुचाकी घेऊन लोहिया मैदानाकडून बसवेश्वर चौकाकडे सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास निघाले. लाईन गल्ली ते मोठे हनुमान मंदिर रोडवर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून रस्ताअतिशय अरुंद करून ठेवला आहे. तसेच आपल्या दुकानातील साहित्य रस्त्यावर मांडले आहे. सायंकाळच्या वेळी दररोजगार रस्त्यावर अत्यंत वर्दळ होत असते. या रस्त्याने पुढे जात असताना शरीफ जनरल वस्तूंचे मालकाने दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवल्यामुळे पुढे जाता येत नव्हते. म्हणून राहुल देगावकर यांनी दुकानदार साहित्य बाजूला करा अशी विनंती केली. तेव्हा दुकानदार जमील उस्मान याने रस्त्यावरील साहित्य बाजूला न घेता तू निघून जा काय करायचे ते करून घे, असे म्हणत शिवीगाळ करीत राहुल देगावकर यांना पकडून ठेवले. त्याचा एक मुलगा इरफान दुकानातून लोखंडे रोड घेऊन आला. त्याने राहुल देगावकर यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला रोडने जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. राहुल देगावकर यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस ठाण्यात उपरोक्त व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे प्रकार पुन्हा न होण्यासाठी देगलूर शहरातील सर्व रहिवाशांनी प्रशासनाचा विनंती केली की बाजारातील सर्व अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे अन्यथा सर्वपक्षीय आंदोलन नगरपालिकेवर काढण्याचा इशारा दिलेला आहे.