
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
गुरुवार दिनांक २५/८/२०२२ रोजी दुपारी २ वाजता इंदापूर येथे ॲड. नितीन राजगुरू उच्च न्यायालय मुंबई आणि ॲड. रेखा मुसळे उच्च न्यायालय मुंबई यांच्या शहा सांस्कृतिक भवनाच्या शेजारील नूतन ऑफिसचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे सिनियर वकील मा. श्री. अशोक ताजने सर यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम इंदापूर बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड मा श्री मनोहर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सिनियर ॲड श्री ताजने सर यांनी अनेक फौजदारी, दिवाणी केसेस आणि रिट याचिका मध्ये पक्षकार यांची बाजू मांडून त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.
सदर कार्यक्रम नंतर ४ वाजता इंदापूर बार असोशिएशन येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सिनियर वकील मा. श्री अशोक ताजने सर यांचे मेडिकल जुरुसपृडन्स आणि डाइंग डीक्लरेशन या विषयी व्याख्यान आयोजित केलेले आहे. तसेच सिनियर ॲड श्री ताजने सर यांच्या कडून इंदापूर बार असोशिएशन लायब्ररी साठी कायद्याची पुस्तके भेट दिली जाणार आहेत. या नूतन ऑफिस उद्घाटन आणि कायदेविषयक व्याख्यानासाठी इंदापूर बार असोशिएशनचे सर्व सदस्य वकील बंधू आणि भगिनीं यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बार चे अध्यक्ष ॲड. श्री मनोहर चौधरी, उपाध्यक्ष ॲड सुभाष भोंग, सचिव ॲड. श्री आशुतोष भोसले यांनी केलेले आहे.