
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम– नाभिक समाजाचे आराध्य दैवत संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नाभिक समाज बांधव यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नाभिक संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमाने मोठ्या आयोजन केले होते. भूम ग्रामिण रुग्णालय व मूकबधिर विद्यालय येथे फळांचे वाटप करण्यात आले, तसेच श्री संत सेना महाराज मंदिर कसबा येथे हनुमंत भजनी मंडळ, सिद्धिविनायक महिला भजनी मंडळ ,महादेव भजनी मंडळ,सावता माळी भजनी मंडळ यांचा भव्य आसा भजनाचा कार्यक्रम झाला. ठीक १२ वाजता श्री संत सेना महाराज मुर्तीवर गुलाल व फुलांची उधळण करून आरती करण्यात आली.नंतर महाप्रसादा चे आयोजन आले होते.
या वेळी भूम ग्रामीण रूग्णालयाचे डॉ.श्री सुहास जगदाळे साहेब, माझी पुरवठा अधिकारी अरुण चौधरी साहेब, जिल्हा संघटक दत्ता शिंदे, तालुका अध्यक्ष दादासाहेब राऊत, विकास यादव, शहराध्यक्ष संजय चौधरी, दिगंबर सांगळे, तालुका उपाध्यक्ष राकेश चौधरी, संभाजी चौधरी, बाळासाहेब चौधरी, भाग्यवंत यादव, माउली चौधरी, अक्षय चौधरी, आस्रु चौधरी, सुनील चौधरी, श्रीराम चौधरी, विलास चौधरी ,अमोल शिंदे, प्रवीण शिंदे, सागर पंडित, राहुल झांबरे , सचिन चौधरी , राजाभाऊ पवार , अमोल काळे , रवी राऊत , रंजीत राऊत,अविनाश गाडेकर व सर्व समाज बांधव, संघटनेचे पदाधिकारी व मित्र परिवार उपस्थित होते.