
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
उदगीर शहर हे गजबजलेले शहर असून उदगीरच्या अतिशय गजबजलेल्या प्रभाग अठरा मधील वेंकटेश नगर नल्ले नगर कानमंदे नगर व शिवधाम सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून सायंकाळच्या वेळी आभार वृद्धांना चालण्याचा खूप त्रास होत असून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी अत्यंत वाईट दूर अवस्था झाली असून वाहनांना जाण्यास व नगरीतील बालकांना याचा खूप त्रास होत असून पावसाळ्याच्या दिवसात तर वाहनांचा व नगरीतील नागरिकांना चालणे खूप कठीण होत असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगरपालिका लक्ष देईल काय व रस्ते दुरुस्ती होतील का व मंत्री महोदय याकडे लक्ष देतील काय अशी अपेक्षा व्ही एन के नगर मधून होत आहे.