
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
परभणी : जिल्ह्यातील मराठी पत्रकारांसाठी “आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार” सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्या मराठी पत्रकारांनी मागील वर्षभरात शेती, पूरग्रस्त, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, सहकार, पर्यावरण, भौगोलिक, व्यावसायिक, आजन्म घटना, सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर शोध पत्रकारिता करुन पत्रकारितेला साजेसं, भरीव असे योगदान दिले आहे, अन्यायाला वाचा फोडून लिप्त अन्याय ग्रस्तांना व त्या विभागाला न्याय मिळवून दिला आहे, शासन-प्रशासन स्तरावरील अशा भ्रष्टाचाराला पुराव्यासह वाचा फोडून मराठी पत्रकारितेची मान उंचावली जाईल असे कौतुकास्पद कार्य परभणी जिल्ह्यातील ज्या मराठी पत्रकार बंधू-भगिनींनी केले आहे, त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
“वामन-गंगा स्मृती” प्रित्यर्थ आयोजित पुरस्काराचे स्वरुप प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये ११००१/-, स्मृती चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक रोख रक्कम रुपये ७००१/-, स्मृती चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रोख रक्कम रुपये ५००१/-, स्मृती चषक, प्रमाणपत्र असे राहिलं. त्याशिवाय शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उपस्थित दिग्गज मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा यथोचित सन्मान केला जाईल.
तरी जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त मराठी पत्रकार बंधू-भगिनींनी आपल्या वृत्तपत्राचे नाव, नियुक्ती पत्र, ओळख पत्र आणि ज्या शोध पत्रकारिते विषयी वृत्तांकन केले आहे त्याच्या तीन प्रती (झेरॉक्स) दुय्यम प्रतींमध्ये जोडून आगामी १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत “परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालय, जलतरणी का संकुल, गाळा क्र. ९, दै. एकजूट कार्यालय, स्टेशन रोड, परभणी-४३१ ४०१ या पत्यावर पाठवावेत किंवा ९८६०११७५९२ आणि ९४०४८६४७०० या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती दत्तात्रय वामनराव कराळे आणि श्री राजकुमार ठोके यांनी केली आहे. हा पुरस्कार सोहळा परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सहकार्याने पार पाडला जाणार आहे.