
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा-संभाजी गोसावी
वाई पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये वाई येथून साडेदहा लाख रुपये किंमतीचा टेम्पो चोरीस गेला होता याबाबतची फिर्याद कार्तिकुमार सोहनलाल ओसवाल (रा. गणपती आळी वाई) यांनी सोमवारी वाई पोलीस ठाण्यांत तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षांत घेता पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब भरणे व त्यांचे सर्व पोलीस सहकारी यांनी अवघ्या चार तासांत चोरीस गेलेले टेम्पो पकडला याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेली माहितीनुसार कार्तिकुमार ओसवाल यांच्या मालकीचा टेम्पो (एम एच१२-एचडी ४१७१) हा वाई पाचवड रोडवरील एका वजन काट्यासमोर उभा होता तिथून टेम्पो चोरीस गेला होता. असा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे खराडे मॅडम यांना दिली. यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी तपासांची चक्र गतिमान करीत चोरीस गेलेल्या टेम्पो व आरोपी महिगांव येथील आहेत. वाई पोलिसांचे पथक माहिगांव गावात शोध घेत असताना बंद पडलेल्या स्टोन क्रेशरसमोर टेम्पो दिसला. तिथे पोलीस गेले असता टेम्पोमध्ये बसलेले दोघेजण पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्यांचा प्रयत्न करु लागले. तेव्हा पाठलाग करुन पोलिसांनी त्यांना पकडले त्यांना विश्वासांत घेवुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करीत या दोन्ही आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली यानंतर आरोपींना ताब्यांत घेऊन टेम्पो जप्त करण्यांत आला.( शेखर उर्फ चिंग्या अशोक घाडगे वय ३३ रा. सोमजाईनगर वाई व बबन केशव पवार वय ४२ रा. महिगांव ता. जावली जि. सातारा) रसिया ताब्यांत घेण्यांत आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाईमध्ये पोलीस निरीक्षण बाळासाहेब भरणे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुबडे, गुन्हे प्रकटीकरण विभागांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के,सोनाली माने, क्षमा माने अमित गोळे आदीं पोलीस कर्मचारी या कारवाईमध्ये सहभाग घेतला त्यांच्या या कारवाईबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.