दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : नवी मुंबईतील ख्रिस्ती मिशनर्यांकडून चालवल्या जाणार्या आश्रमशाळेत कोंडून ठेवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांवर महिला आणि बाल कल्याण विभागाकडून कारवाई करण्यात आली. हे सत्य लोकांपर्यंत पोचवायला हवे. त्यानंतरच हिंदु समाजात जागृती निर्माण होईल. सरकार कुणाचे आहे किंवा नाही, हा विषय नाही. ज्या ठिकाणी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या रायरेश्वराची शपथ घेतली, त्याच महाराष्ट्रात हिंदू बेवारस का ? ‘छत्रपती शिवरायांच्या पावनभूमीत अद्याप धर्मांतरबंदी कायदा लागू करण्यात आलेला नाही’, याची लाज वाटते. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून अनेक महिला, मुली, अल्पवयीन मुली बेपत्ता होत आहेत. यामागे लैंगिक अत्याचार किंवा त्यांची विक्री आदींची शक्यता आहे. धर्मांतर हा आंतरराष्ट्रीय कट आहे. अमेरिका, ब्रिटन, नेदरलँड्स येथून धर्मांतरासाठी भारतात आर्थिक पुरवठा केला जात असल्याचे वक्तव्य अमेरिकेतील एका पाद्रीने केले आहे. यासाठी भारत हे हिंदु राष्ट्र झाले पाहिजे. हिंदु येथे सन्मानाने राहिला पाहिजे आणि सन्मानाने जगला पाहिजे.
