
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि.२३/०८/२०२२ रोजी साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे वंचीत, उपेक्षीत घटकांच्या परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनाच्या लढ्यात या साहित्याचे योगदान अतुलनीय असून अण्णाभाऊ साठे यांनी दलित साहित्याचा आरंभ अतिशय सशक्तपणे केला असल्याचे प्रतिपादन युवक नेते डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केले.
मौजे गंगाहिप्परगा येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सुखदेवराव कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाबुराव देवकते, शिवाजीराव कोंमले, देविदासराव कोमले, देविदास कांबळे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला सरपंच सुखदेव कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक कार्यकर्ते दत्ता वाघमारे यांनी केले.
पुढे बोलताना डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले की,अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजवण्याचे अतुलनीय काम केले असून शाहिरीच्या माध्यमातून येथील नागरीकांचे आत्मभान जागे करण्याचे काम केले आहे.पहिल्या दलीत साहित्य संम्मेलनात ‘पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलीत कामगारांच्या हातावर तरली आहे असे प्रतिपादन करून जागतिक संरचनामध्ये दलित आणि कामगार वर्गाचे महत्त्व जगाला दाखवून दिले.
महापुरुषांच्या जयंती करत असताना जयंतीला केवळ उत्सवाचे स्वरूप येऊ न देता जयंती ह्या प्रबोधनाचे माध्यम ठरावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुरेश कोमले यांनी मानले सरपंच सुखदेव कदम यांच्या अध्यक्ष भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार अजय भालेराव सुनील कोमले नवनाथ कोंमले जयसिंग कोंमले साधूबा कोमले, रामदास कोमले, बालाजी कोमले, भीमराव भालेराव किशन भालेराव , नवनाथ कोमले, बाबुराव कोमले, एकनाथ कोमले, मारोती कोमले,संतोष कोमले, गजानन कोमले,पांडुरंग कोंमले जयंती मंडळाचे अध्यक्ष माधव कोमले आदींनी पुढाकार घेतला.