
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: महाराष्ट्रातील तमाम रोजगार सेवकांच्या मागण्या संदर्भात ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायत सेवेत कायम करण्याबाबत व इतर मागण्यांचे निवेदन रोजगार हमी मंत्री माननीय नामदार श्री संदीपानरावजी भुमरे साहेब यांना त्यांच्या बंगल्यावरती भेटून संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष अमोल वाकोडे व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने मुंबई येथे माननीय रोजगार हमी मंत्री महोदयांची भेट घेऊन राज्यातील ग्रामरोजगारसेवकांच्या अडचणी बाबत चर्चा करून मागण्याचे निवेदन देण्यात आले.त्यावर सकारात्मक चर्चा झाली.