
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरात दि.२३ रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात मित्रत्व ग्रुप आयोजित केलेल्या दहिहंडी महोत्सवाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असुन या कार्यक्रमात मुख्य आकर्षण ठरल्या मिस इंडिया उपविजेती तथा दक्षीणेतील सिने अभिनेत्री सिमा कदम .
अभिनेत्री सिमा कदम हिच्या अदाकारीने हजारो प्रेक्षक घायाल झाले तिने धरलेल्या विविध मराठी गाण्यांवर अनेकांनी धरला ठेका व दहिहंडी चे प्रथम पारितोषिक गंगाखेड येथील राजे संभाजी गोविंदा पथकाने पटकाविले. यावेळी बोलताना युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर म्हणाले की, लोहा वासियांना आणखी विविध मेजवानी देणार.
लोहा शहरात कृष्ण अष्टमी निमित्त दि. २३ रोजी आॅगस्ट रोजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मित्रत्व ग्रुपच्या वतीने भव्य दहिहंडी महोत्सवाचे करण्यात आले होते.
या भव्य दहिहंडी महोत्सवाचे उद्घाटन मिस इंडिया उपविजेती तथा दक्षीणेतील प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिमा कदम, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर,जि.प. सदस्या सौ प्रणिताताई यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य माणिकराव मुकादम होते तसेच प्रमुख उपस्थिती माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष दत्ता भाऊ वाले, गटनेते करीम शेख, नगरसेवक केशवराव मुकादम, छत्रपती धुतमल, नगरसेवक नारायण येलरवाड ,उपसभापती नरेंद्र गायकवाड, युवा नेते दिपक पाटील कानवटे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, युवा नेते सचिन मुकादम, कार्यक्रमाचे आयोजक मित्रत्व ग्रुप चे अध्यक्ष अविनाश पाटील पवार, आडगावच्या सरपंच जयश्री मंगेश पाटील क्षीरसागर, पारडीचे पॅनल प्रमुख माधवराव पाटील पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रविण पाटील चिखलीकर म्हणाले की, भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे जो शिस्त मोडतो त्यांच्यावर कारवाई होते . या अगोदरच्या राज्य सरकारने दहिहंडी सह सर्व सणावर बंदी आणली होती.आता ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. लोहा वासियांना आणखी नवनवीन मेजवानी देऊ तसेच दिपक पाटील कानवटे हे दहिहंडी महोत्सवात सहभागी झाले आहेत त्यांनी आणखी जबाबदारी घ्यावी असे प्रविण पाटील चिखलीकर म्हणाले.
तसेच यानंतर मिस इंडिया उपविजेती तथा दक्षीणेतील प्रसिद्ध सिने अभिनेत्री सिमा कदम हिच्या अदाकारीने प्रेक्षक घायाल झाले तिने डान्स ची झलक दाखवली त्यावर हजारो प्रेक्षकांनी ठेका धरला व त्यानंतर भव्य दहिहंडी फोडण्याची स्पर्धा रंगली यात एका पेक्षा एक सरस असे नांदेड , गंगाखेड येथील एकुण ८ गोविंदा पथकाने कमीत कमी वेळेत दहीहंडी फोडण्याचे प्रयत्न केले . यावेळी प्रक्षेकांचा ही प्रचंड गर्दी करून मुंबई – ठाण्याच्या धर्तीवर लोहयात दहिहंडी महोत्सव बघुन आनंदीत झाले.
यावेळी या दहिहंडी महोत्सवात एक से बढकर एक अशा ८ संघानी सहभाग नोंदविला व गंगाखेड येथील राजे संभाजी गोविंदा पथकाने कमीत कमी वेळात दहिहंडी फोडलेल्या गंगाखेड येथील राजे संभाजी गोविंदा पथकाने प्रथम ३१ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले तर दितीय पारितोषिक संस्कृती गोविंदा पथक नांदेड यांनी २१ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले व तृतीय क्रमांक जय बजरंग गोविंदा पथक नांदेड यांनी ११ हजार रुपयांचे बक्षीस पटकाविले
तसेच या दहिहंडी महोत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक संघात ११०० रूपये ही देण्यात आले.
सदरील दहिहंडी महोत्सव यशस्वी करण्यासाठी मित्रत्व ग्रुप चे अध्यक्ष अविनाश पाटील पवार, युवा नेते सचिन मुकादम, दिपक पाटील कानवटे, भानुदास पाटील पवार, सुधाकर पाटील पवार, कांता बिडवई, व्यंकट जंगले यांच्या सह सर्व मित्र मंडळीनी परिश्रम घेतले.