
दैनिक चालू वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी-
=====================
औरंगाबाद:- सप्टेंबर /आोँक्टोंबर २०२० मधे सदरच्या योजनेची घोषणा दस्तुरखुद्द तात्कालीन मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी घोषीत केली होती.आता त्या घोषणेला जवळ – जवळ दोन वर्षाचा कालावधी लोटला जात आहे.
जेव्हा ठाकरे सरकार अस्थीर झाले होते.तेव्हा घाई घरबडी मधे ठाकरे सरकारने साडे तीनशे ते चारशेच्या आसपास फाईलींना मंजुरी दिली आसे ऐकीवात आहे.आसे हि ऐकवात आहे की त्या पैकी शेकडो ठाकरे सरकारचे आदेश शिंदे सरकारने सत्तेवर येताच रद्द बादल केले.
आ.उध्दवजी ठाकरे साहेबांनी त्याच घिसड घाई मधे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते आपघात योजनेस पण मंजुरी दिली आसती तर सरकार कोणाचे हि येऊ द्या.रस्ते आपघात योजनेला स्थगीती देण्याचे कोणी हि धाडस केले नसते.कारण आपघात कोणाचे हि होतात.फक्त ड्रायव्हरचेच होतात आसे नाहि व ड्रायव्हरच मरतो आसे देखील नाहि.
गरीब,श्रीमंती,व्यापारी,शेतकरी, राजकारणी.या सार्वांचे जवळचे दुरचे नातेवाईक,मित्र ,सगे सोयरे कोणी हि कधी हि व कुठे हि आपघाता मधे सापडू शकतो.त्या मुळे सदरच्या योजनेचे सर्वच स्तरा मधुन ठाकरे सरकारचे कौतुकच झाले आसते.
दुर्दैवाने १०८ ला पण हद्दीचे बंधने आहेत.करीता रस्ते आपघात योजना कार्यान्वीत झाली तर आपघात ग्रस्तांना जवळच्या हाँस्पीटल मधे तात्काळ उपचार मीळतील व तात्काळ उपचार मिळाल्या मुळे मरणारा व्यक्ती देखील मरणार नाहि.
औषधोपचार वेळेवर जर मीळाले नाहि तर न मरणारा व्यक्ती देखील मरू शकतो.कारण हाँस्पीटलवाले डिपाँझिटची मागणी जी करतात.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते आपघात योजना तातडीने कार्यान्वीत करण्यात यावी मणुन दि.३०/०७/२०२२ रोजी ता.मालेगाव जि.नाशिक येथे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री प्रवीण वाघ यांच्या सह ५ लोकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे साहेबांची भेट घेऊन निवेदन दिले होते.तसेच दि.३१/०७/२०२२ रोजी औरंगाबाद येथे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर,संतोष गडवे,लक्ष्मण सोनवणे,लक्ष्मण शेंडगे,लक्ष्मण वाघ,रविंद्र उर्फ बंडू आढाव,सुरेश गायकवाड,बापू गाडेकर,पालमचे रामदास कोकोटे व सिल्लोड येथे अंबादास ठाकरे व त्यांच्यासह इतर 5 सदस्यांनी पण मुख्यमंत्री श्री शिंदे साहेबांना वरील मागणाचे निवेदन दिले होते.
दि.२२/०८/२०२२ रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांनी परत मुख्यमंत्री महोदयांना इ मेल ध्दारे स्मरण पत्र पाठवलेले आहे.