
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर: दि. २४: भोकरचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवासराव उर्फ बापूसाहेब बाबासाहेब देशमुख गोरठेकर (वय ८०) यांचे नांदेड येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार चालू असताना बुधवार, दि. २४ रोजी रात्री निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी हैदराबाद येथे उपचार करण्यात आले होते. नंतर त्यांना नांदेड येथे दाखल करण्यात आले होते.
गोरठेकरांचे घराणे जुन्या काळापासून राजकारण व समाजकारणात कार्यरत आहे. बापूसाहेबांचे वडील बाबासाहेब देशमुख हे देखील त्या भागाचे आमदार होते. त्यांच्या पश्चात राजकारण व समाजकारणांची परंपरा बापूसाहेबांनी चालविली. हे दोघेजण निष्कलंक राजकारणी होते.
बापूसाहेब गोरठेकर हे भोकर तालुक्यातील किनी जिल्हा परिषद सर्कलमधून जि.प.वर निवडून आले होते. त्यानंतर ते जि.प.चे उपाध्यक्ष होते. त्यानंतर काही काळ बापूसाहेब जि.प.चे अध्यक्ष देखील होते. बापूसाहेब गोरठेकर हे उमरी, भोकर या परिसरातील लोकनेते होते. त्यांनी उमरी तालुक्यात सिंचन विषयक अनेक कामे केली. विशेषतः बळेगाव बंधाऱ्यासाठी निधी आणण्याचे काम त्यांनीत्यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. २५ रोजी मूळगावी गोरठा येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
केले. उमरी तालुक्यातील राजकारणावर बापूसाहेबांचे वर्चस्व होते. गेल्या १५ वर्षापासून उमरी नगरपालिकेवर बापूसाहेब गोरठेकर यांची एकहाती सत्ता आहे.
त्यांच्या राजकारणाचा विचार केला तर सुरुवातीला ते अपक्ष होते. नंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते अनेक वर्ष नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष होते. मध्यंतरी काही काळ त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण त्यानंतर अलिकडेच त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये पुनरागमन केले होते. उमरी येथील नुतन विद्यालय, यशवंत विद्यालय, बाबासाहेब गोरठेकर महाविद्यालय आणि भोकर येथील शाह विद्यालय या त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, सभापती शिरीष गोरठेकर, जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोरठेकर ही दोन मुले, तीन मुली, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. अॅड. भाऊसाहेब गोरठेकर यांचे ते चुलत बंधू होत.