
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी –राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर :- दि.२५/०८/२०२२ अहमदपूर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या शहरात वीस च्या वर शासकीय कार्यालय असून या कार्यालयात कर्मचारी वेळेत येत नाहीत व वारंवार विनापरवानगी गैरहजर राहण्यासंबंधी नागरिकांच्या तक्रारी व पत्रकार संघाच्या निवेदनानंतर अनुपस्थित कर्मचारी विरुद्ध व त्यांच्या विभाग प्रमुखाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी एका आदेश सांगितले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर शहर तालुक्याचे मुख्यालय असल्याने सर्व शासकीय कार्यालय कार्यरत आहेत. त्या कार्यालयात पाच दिवसाचा आठवडा असतानाही अनेक कर्मचारी सोमवारी उशिरा येणे लवकर निघून जाणे कार्यालयीन वेळ सकाळी ९.४४ ते ६.१५ असतानाही मध्येच विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय गैरहजर राहणे, कारण नसताना मीटिंग असल्याचे सांगणे, लातूर अथवा इतर शहरातून उप डाऊन करणे, त्यामुळे नागरिकांची कुचुंबना होत असून अनेक नागरिकांना विनाकारण कार्यालयात चकरा मारावा लागत आहेत. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. शहरातील पंचायत समिती, नगरपरिषद, तहसील कार्यालय, महावितरण, तालुका भूमी अभिलेख, कार्यालय, दुय्यम निबंधक, पाटबंधारे मंडळ क्र९ व १० मृदा व जलसंधारण कार्यालय ,वनीकरण कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, पशुसंवर्धन उपायुक्त ग्रामीण रुग्णालय अशा सर्वच कार्यालयात वरील बाबी आढळून आल्याने उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभाग प्रमुखांना आदेश काढला असून कर्मचारी गैरहजर राहिल्यास विभाग प्रमुखावरच शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्याला शिस्त लागणार असून अनेक नागरिकांचे कामे मार्गी लागणार आहेत. सोमवार हा बाजार दिवस असून तोच दिवस कार्यालयीन दिन असून नियमाप्रमाणे विभाग प्रमुख व त्यांचे संबंधित कर्मचारी यांनी त्यादिवशी उपस्थित राहणे बंधनकारक असतानाही बैठकीचे कारण सांगून अनेक अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहत आहेत. यावरही अंकुश बसणार आहे. पत्रकार संघाच्या निवेदनावर अध्यक्ष प्रा विश्वंभर स्वामी उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, संघटक बालाजी पारेकर, बालाजी तोरणे पाटील, राजकुमार सोमवंशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
विभाग प्रमुखावरच कारवाई पत्रकार संघाची निवेदन प्राप्त झाले असून याबाबत एक आदेश काढला असून ज्या कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित आहेत वेळेचे पालन करत नाहीत विनापरवाना अनुपस्थित राहतात अशा सर्व कर्मचाऱ्यांना व तसेच त्यांच्या विभाग प्रमुख विरुद्ध कारवाई करण्यात येणार असून दर सोमवारी नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकारी सदर प्रत्येक कार्यालयाची तपासणी करण्यात असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले.