
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
राजेगांव ता .दौंड :
२५ ऑगस्ट २०२२
प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्य समाज निर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्य समाज निर्माण संस्था कार्यालय राजेगाव येथे मोफत नेत्र तपासणी आणि शस्रक्रिया शिबीर पार पडले.
या शिबिरात २९ रुग्णांनी सहभाग नोंदविला .
मोतीबिंद शस्त्रक्रियासाठी १७ रुग्णांना पात्र करण्यात आले .
बुधराणी हॉस्पीटल पुणे येथे रुग्णांची विनाशुल्क शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे .यावेळी
प्रहार जनशक्ती पक्षाचे दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे – देशमुख , बुधराणीचे डॉ. गिरीश पाटील , महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती पुरस्कर्ते राजेंद्र कदम , गणेश वाघमारे , निलेश होले उपस्थित होते .
प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील आजपर्यंत हजारो रुग्णांच्या शस्त्रक्रिया बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे यशस्वी झाल्या आहेत .
राजेगाव येथे प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेला मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू निदान शिबिर घेण्यात येते.