
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
प्रा. धिरजभाऊ सेडमाके प्रदेशाध्यक्ष म.रा. जनसेवा गोंडवाना पार्टी यांच्या हस्ते पार्टीचा प्रथम वर्धापन दिना निमित्त प्रदेश कार्यालय गोंडवाना भवन, गोंडवाना नगर, कोसारा चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात झेंडा वंदन करण्यात आले.
जनसेवा गोंडवाना पार्टीच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त प्रदेश कार्यायालयात प्रदेशाध्यक्ष धीरज शेडमाके यांच्या हस्ते झेंडावंदन करून मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला चंद्रपूर लोकसभा अध्यक्ष बंडू मडावी, चंद्रपूर लोकसभा संघटक विनोद शेंडे, चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई पेंदोर, चंद्रपूर महिला शहर अध्यक्ष सोनालीताई आत्राम, चंद्रपूर उपजिल्हाध्यक्ष गणेश कुळसंगे, चंद्रपूर शहर प्रमुख रणजीत येरकाडे, कोरपना तालुका प्रमुख शांताराम कुळसंगे, राजुरा तालुका प्रमुख सुदर्शन आत्राम, सिंदेवाहि तालुका प्रमुख प्रल्हाद उइके, वरोरा तालुका प्रमुख निलेश कुमरे, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख मिथुन मसराम, कोरपना उपतालुका प्रमुख मधुकर मडपती, नारंडा पंचायत प्रमुख आशीष किनाके, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.