
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- दि.२५/०८/२०२२ रोजी साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची१०२ वी जयंती मौ.ढाळेगाव ता. अहमदपूर जि.लातूर येथे साजरी करण्यात आली तसेच साहित्य हे वंचीत, उपेक्षीत घटकांच्या परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असून महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनाच्या लढ्यात या साहित्याचे योगदान अतुलनीय असून अण्णाभाऊ साठे यांनी दलित साहित्याचा आरंभ अतिशय सशक्तपणे केला असल्याचे प्रतिपादन श्री शिवाजीराव भिकाणे यांनी मौ.ढाळेगाव येथे
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवाजीराव भिकाणे (उपसरपंच) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.मनिषाताई भिंगे( सरपंच) नामदेव कदम, बब्रुवान शेकडे, सुरेश आलापुरे, रावसाहेब कदम, शिवानंद कांबळे, शिवाजी कांबळे,भिवाजी पलमटे आदींची उपस्थिती होती. सुरुवातीला सौ.मनिषाताई भिंगे व शिवाजीराव भिकाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक कार्यकर्ते व जयंती मंडळाचे अध्यक्ष बळीराम कांबळे यांनी केले.
पुढे बोलताना म्हणाले की,अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जनमानसात रुजवण्याचे अतुलनीय काम केले तसेच
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी कांबळे यांनी मानले सरपंच शिवाजीराव भिकाणे यांच्या अध्यक्ष भाषणानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तानुबाई भिवाजी पलमटे ग्रा.पं .सदस्या,महादेव कांबळे, बळीराम परगे, उद्धव कांबळे,हानमंत कांबळे, गणेश कांबळे, कृष्णा कांबळे, बालासाहेब गुळवे,लक्ष्मण गुळवे, विरेंद्र कांबळे, रामदास भंडारे,गोपाळ बुजारे,सुशील गुळवे, कार्यक्रम यशस्वीतेसाठी आदींनी पुढाकार घेतला