
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ लढवय्ये नेते म्हणजे गंगाधर महाबळे असुन आज दि. २६ आॅगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
गंगाधर महाबळे हे १९७८ पासून आंबेडकरी चळवळीतील सक्रिय आहेत. त्यांनी लोहा शहर व तालुक्यात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधीसत्व परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व प्रथम लोहा शहरात काढण्यासाठी पुढाकार घेतला त्यानंतर लोहा तालुक्यातील ग्रामीण भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. १९७८ पासुन ते १९९३ पर्यंत नामांतर लढ्यात त्यांनी लोहा तालुक्यातून ते अग्रभागी होते. पूर्वी आताचे वातावरण नव्हते जातीवाद मोठ्या प्रमाणात फोफावला होता . दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी काही लोक मज्जाव करीत होते तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन लोहा शहरातील अनेक विहीरी मोकळ्या करण्यासाठी पुढाकार घेतला.तसेच अनेक न्हावी दलितांच्या कटींग करीत नव्हते त्यांना आपल्या निर्भीड बाणा दाखवून समजून सांगितले व दलितांच्या कटींगी करण्यासाठी सुरूवात झाली.
तसेच त्यांचे जेष्ठ सहकारी कालवश संभाजीराव धुतमल साहेब , यांच्या सोबत आंबेडकरी चळवळीत अनेक वर्ष काम केले. त्यावेळी गोरगरीब दलित पिडीतांना न्याय देण्यासाठी त्यांना कायदा कानून समजून सांगण्याचे अर्ज लिहून देण्याचे काम कालवश एम . आर कापुरे गुरुजी व जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे यांनी सहकार्य केले.
त्यांनी सुरुवातीला आंबेडकरी चळवळीतील महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी राज्यपाल कालवश रा.सु. गवई साहेब , अॅड गौतम दादा भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्यानंतर राज्यात अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारिप बहुजन महासंघाचे लोहा तालुक्यात काम केले १९९३ च्या लोहा न.पा.च्या निवडणूकीत भारिपचे दोन नगरसेवक निवडून आणण्यासाठी सिंहांचा वाटा उचलला लोहा न.पा. चे भारिपचे पहिले उपनगराध्यक्ष म्हणून कालवश संभाजीराव धुतमल साहेबांनी मान मिळविला असे त्यांनी सांगितले.
तसेच लोहा शहर व तालुक्यात कुठे गोर गरीब, दलितांवर अन्याय झाला तर ते तात्काळ तेथे धावून जातात सामाजिक कार्यात , धार्मिक कार्यात सदा अग्रेसर राहतात . तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे ते खरे पाईक असुन भिमजयंती, बुद्धजयंती , श्रामणेर शिबीर यशस्वी करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी एकनिष्ठ असणारे अॅड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे काम करणारे तसेच लोहा तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील एकमेव जेष्ठ लढवय्ये नेते असणारे गंगाधर महाबळे यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
विलास सावळे
. लोहा
.