
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर :परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्रा. विद्यालयात 5वी ते 7वी या तीनही वर्गाचे वर्गश: पालक मेळावे घेण्यात आले. दि. 22-08-22 या रोजी 7वीचा पालक मेळावा घेण्यात आला. या पालक मेळाव्यास प्राथमिक शालेय समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर माता पालक प्रतिनिधी वैदेही शास्त्री व विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारत माता व श्री गुरूजी यांच्या प्रतिमेचे पुजन करून पालक मेळाव्यास सुरवात करण्यात आले. या पालक मेळाव्यास पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विद्यालयात घेतले जाणारे विविध प्रकारचे उपक्रमांची माहिती पालकांना सांगण्यात आली. पालक -शिक्षक यांच्यात प्रगल्भ चर्चाही झाली. विद्यार्थींच्या सर्वागीण विकास कसा साधता येईल, यासाठी नेहमी शिक्षकांनी प्रयत्नशील राहावे. अशा विविध प्रकारच्या अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली.पालकांनी विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमाचे स्वागत केले.दि. 23-08-22 रोजी इयत्ता 6 वीच्या पालक मेळाव्याचे आयोजन केले.या पालक मेळाव्यासाठी स्थानिक सहकार्यवाह गिरीषभाऊ गोळे, स्थानिक सदस्य भागवत तम्मेवार व विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर उपस्थित होते. या पालक मेळाव्यासही पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दि. 24-08-22 या रोजी 5वीचा पालक मेळावा घेण्यात आले.या पालक मेळाव्यास स्थानिक अध्यक्ष चंद्रकांत रेखावार,स्थानिक सदस्य नारायण पोलावार पालक प्रतिनिधी राजाभाऊ कदम साहेब (तहसिलदार-देगलूर), डॉ.निलराज पाटील,सिद्धार्थ आलूरकर,विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर उपस्थित होते. याही पालक मेळाव्यास पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. पालकांना मार्गदर्शन करताना तहसीलदार कदम साहेब, पोलावार नारायण, डॉ. निलराज पाटील, सिद्धार्थ आलूरकर यांनी विद्यार्थींचा सर्वागीण विकास करण्यासाठी कवायत,शारीरिक खेळ, बौद्धिक कार्यक्रम घ्यावे असे सांगितले.पालक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यात एकरूपता असली पाहिजे.तरच विद्यार्थींचा सर्वागीण विकास साधता येईल.पालक मेळाव्यात उपस्थित मान्यवरांचे, पालकांचे ऋण देगावकर दमन यांनी व्यक्त केले.या पालक मेळाव्यास कुलकर्णी स्मिता, भानुदास शेळके, सचिन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.