
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
औंध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये खटाव तालुक्यांतील वडगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील दरोड्यातील चोरट्यांना औंध, पुसेसावळी पोलिसांनी काही तासांतच उलगडा करुन संशयित आरोपींच्या आवळल्या मस्क्या. (हर्षवर्धन हरिश्चंद्र घागे वय २० रा. शाहूनगर सातारा व यश संजय घागे वय१९ रा. दौलतनगर सातारा व सोमनाथ नागमल वय २० रा. वडगाव ता. खटाव जि. सातारा) अशी ताब्यांत घेण्यांत आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत पोलीस सतरा कडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक 8 ऑगस्ट रोजी मध्य रात्रीच्या सुमारांस अज्ञात चोरट्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडगाव येथील शाखेवर दरोडा टाकला होता बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला होता तसेच गॅसकटरच्या साह्यांने तिजोरी फोडण्यांचा प्रयत्न केला होता मात्र चोरट्यांना रोकड हाती लागलीच नाही. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ औंध पुसेसावळी पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास तपासांची चक्रे गतिमान करीत. पोलिसांच्या तीन वेगवेगळ्या टीम बनवून सीसीटीव्हीच्या व सीडीआर मोबाईल यांच्या तांत्रिक माहितीवरुन दोन संशयित आरोपींना गुन्ह्यांत वापरण्यांत आलेली चार चाकी स्कारर्पिओ गाडीसह सातारा येथून ताब्यांत घेण्यांत आले तर एका आरोपीस वडगावीतून ताब्यांत घेण्यांत आले सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे पुसेसावळी पोलीस ठाण्यांचे पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी राहुल सरतापे, राहुल जाधव, किरण हिवरे, महेश जाधव आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. औंध, पुसेसावळी पोलिसांच्या कामगिरीबदल सर्वत्र कौतुक होत आहे.