
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – -राजेश गेडाम
आज दिनांक 26 /8 /2022 रोजी कृष्णा नगरी स्थित सनीज स्प्रिंग डेल शाळेच्या प्रांगणात पोळ्याचे औचित्य साधून केजीच्या विद्यार्थ्यांसाठी तान्हा पोळा आणि येलो कलर डे साजरा करण्यात आला. आज शाळेत केजीचे लहान लहान मुले तान्हा पोळा साजरा करण्यासाठी सुंदर सुंदर पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करून तसेच आपले लाकडाची नंदीबैल सुंदर सजवून आले होते. काही मुला़ंचे नंदीबैल छोटे तर काहींचे मोठे होते परंतु प्रत्येकानी आपला नंदीबैल सुंदर सजवून आणलेला होता . मुलांना आपल्या संस्कृती बद्दल आणि आपल्या सणांबद्दल माहिती व्हावी म्हणून अशा सणांचे छोटे छोटे सेलिब्रेशन शाळेत करण्यात येतात तसेच मुलांना रंगांबद्दल अधिक माहिती व्हावी यासाठी दर महिन्यात रंगांच सुद्धा सेलिब्रेशन करण्यात येतं.
आज केजी प्रमुख कल्पना जांगडे व प्राचार्य शेफाली पाल यांनी नंदीबैलांची पूजा करून तसेच श्रीफळ फोडून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच केजीच्या कॉर्डिनेटर सौ कानतोडे मॅडम यांनी मुलांना पोळ्याच्या सणाबद्दल माहिती सांगितली,
आणि मुलांना रंगाबद्दल अधिक माहिती व्हावी यासाठी केजीतील शिक्षकांनी सेल्फी पॉईंट डेकोरेट केला होता. शेवटी शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल मॅडम आणि प्रायमरी इन्चार्ज सौ गंगाखेडकर मॅडम यांनी सर्व ऩदीबैलांचे परीक्षण करून त्यातील सर्वात सुंदर सजलेल्या नंदीबैलाला पहिला दुसरा आणि तिसरा असा क्रमांक दिला. मुलांना शेवटी पोळ्याची भेट वस्तू
म्हणून पेन्सिल आणि चॉकलेट देण्यात आले.