दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””””””””””
परभणी : शहरातील नागरिकांना चांगले व दर्जेदार रस्ते देणे, चालण्या योग्य फूटपाथ, नैसर्गिक व घाण पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होणारी गटारे व नाल्यांची निर्मिती व बांधकामे करुन देणे ही महापालिका प्रशासनाचीच जबाबदारी असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी मनपा आयुक्त देविदास पवार यांना दिले.
मागील काळात होणाऱ्या संततधार पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांच्या विरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ओरड केली होती. रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी भयानक अवस्था होऊन त्यात साचलेल्या पाण्यामुळे निर्माण चिखल व घाण पाणी पायी रहदारी करणारे नागरिक व वाहनांवर मोठ्या प्रमाणात उडला जाण्याचे प्रकार सातत्याने घडत होते. परिणामी नागरिक व व्यापारी वर्गांच्या संताप अनावर झाला होता. दैनिक चालू वार्ता या मराठी वृत्तपत्राने या सगळ्या समस्यांची “आंखो देखा हाल” ची व्यथा सातत्याने मांडून शासन-प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले. त्रस्त नागरिकांचा आवाज प्रशासनाच्या पोहोचवण
याचे काम दै.चालू वार्ता द्वारे निष्ठेने केले गेले. त्यामुळे नागरिकांनाही दिलासा मिळत गेला. त्याच परिपाक म्हणून काल जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतः पायी चालत सुमारे पाच कि.मी.च्या परिसरातील रस्ते प्रत्यक्ष पाहणी केले. त्यांना प्रत्यक्षात ज्या ज्या समस्या आढळून आल्या, त्याविरोधात संताप व्यक्त करत मनपा आयुक्त, सा.बां.चे व मनपाचे इंजिनिअर्स यांना महत्वाचे निर्देशही दिले.
जिल्हाधिकारी यांनी ज्या ज्या रस्त्यांची पायी चालत पाणी केली त्यात दर्गा रोड सिमेंट रस्ता, जुना पेडगाव ते रायगड कॉर्नर, जेल कॉर्नर पासून ग्रॅन्ड कॉर्नर, खंडोबा बाजार ते हडको आणि मोठा मारुती ते उघडा महादेव मंदीर या सर्व रस्त्यांचे निरिक्षण करतांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जुना पेडगाव रस्त्यावरील विवेकानंद नगराजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले अतिक्रमण तात्काळ हेरले. कमी झालेला रस्त्याचा आकार त
त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी चक्क टेपच लावली व अतिक्रमण तात्काळ हटविले जावे, असे आयुक्तांना निर्देश दिले. पावसाळ्यानंतर ज्या ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते पूर्णपणे बुजवून घेण्याच्या व दुरुस्ती करण्याच्या सूचना यावेळी उपस्थित दोन्ही इंजिनिअर्सना तर त्यांनी दिल्याच शिवाय तुम्ही स्वतः जातीने लक्ष घालावे असेही सांगितले.
शहरातील नागरिकांना चांगले व दर्जेदार रस्ते देणे, चालण्या योग्य फूटपाथ देणे, नैसर्गिक व घाण पाणी यांचा योग्य प्रकारे निचरा होणारी गटारे, नाल्यांची निर्मिती व बांधकामे करुन देणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारीच असल्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आयुक्त देविदास पवार यांना सांगितले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी यांच्या सोबत मनपा आयुक्त देविदास पवार, सा.बां.चे कार्यकारी अभियंता एस्.एस्. पाटील, पोलीस निरीक्षक सचिन इंगेवार, मनपाचे अभियंता पवन देशमुख आणि इत्तर बरेचसे अधिकारी, कर्मचारी सोबत होते.