
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- स्व.राजेंद्र कतोरे व स्व.उमेश माकोडे यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ शिवभक्त ग्रुप व जलजला गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.दि.२५ ऑगस्ट २०२२ रोजी संगत संस्थान,बारगणपूरा,अंजनगाव सुर्जी येथे हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात होता.यावेळी सुमारे ९० रक्तदात्यांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.या रक्तदान शिबिराला उपविभागीय पोलीस अधिकारी सच्छिंद्र शिंदे व पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
यावेळी सागर दातीर,अंकुश होटे,अक्षय गवळी,आकाश येऊल,गौरव नेमाळे,श्रेयश राऊत,विश्वंभर माकोळे,ऋत्विक विधळे,ऋग्वेद सरोदे,तुषार रोंघे,ओम माकोळे,धृव मोरे,शुभम उंबरकर,मुकेश पोरे,ओम दातीर यांनी परिश्रम घेतले.शिबिराचे तांत्रिक संचालन बर्मा ब्लड बँक परतवाडा या रक्तपेढीने केले.