
दैनिक चालु वार्ता उपसंपादक औरंगाबाद-मोहन आखाडे
औरंगाबाद शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे..
तर पाण्याची उपलब्धता, साठवण क्षमता, पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी व पडताळणी करून खात्री पटल्यावरच त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महानगरपलिकाचे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांना केल्या सूचना..
मा. उच्च न्यायालयाने शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले असून, त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वेळापत्रकाची तपासणी आणि पडताळणी करून अहवाल देण्याची सूचना केलेली असून पूर्ण पडताळणीनंतरच तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याचा निर्णय होणार आहे…
तसेच, जलवाहिनीची दुरुस्ती, संंच बांधणे, नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनीचे काम सुरू करणे, गळत्या शोधणे, व्हॉल्व्ह दुरुस्ती करून बदलणे, फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची वाळू बदलणे, व्हॉल्व्ह नव्याने बसविणे, अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यासह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत.
• शहर पाणीपुरवठा योजनेतील जुनी 56 मि. मी. व्यासाची जलवाहिनी बदलण्यासाठी 193 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्प व्यवस्थापन समितीने तयार केलेल्या प्रकल्प आराखड्यास मान्यता दिली असून, आराखडा शासनाला सादर केला जाईल. एमजेपीकडून ती योजना राबविण्यात येणार आहे. याकरिता पूर्ण निधी शासनाकडून मिळावा, अशी मागणी केल्याचे तसेच सध्या चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे डॉ. अभिजित चौधरी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.