
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक-दत्तात्रय वामनराव कराळे
पूर्णा तालुक्यातील न-हापूर येथील विविध कार्यकारी सोसायटी घ्या निवडणूकीत ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे मात्र पॅनल प्रमुख श्री नवरे यांचाच पराजय झाल्याने विरजन पडल्याची चर्चा होत आहे.
परभणी जिल्हा स्थानापासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर न-हापूर नावाचे गाव आहे. पूर्णा तालुक्यातील या गावची जनता तशी राजकीय सुशिक्षित आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिक तसे राजकारणात मुत्सद्दी असतात असा बोलबाला ऐकिवात आहे. त्याचीच चुणूक या निवडणूकीत दाखवून दिली तर नसावी ना, अशीही शक्यता वर्तवली गेल्यास नवल वाटू नये. तथापि १३ पैकी १२ उमेदवार जास्तीत जास्त मतांनी विजयी करणा-या मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करणारे श्री. नवरे यांनी आपला स्वत:चा पराजयाची छटा मात्र चेह-यावर प्रदर्शित होऊ दिली नाही. नियतीने पराजय करुन मानसिक कणा दाबण्याचा प्रयत्न जरी केला असला तरी श्री नवरे यांनी सहकारी मित्रांच्या आनंदातच खरा दिलदारपणा दाखवून दिला हे विशेषण म्हणावे लागेल. अगदी प्रचार काळापासून असलेला जोश निकालानंतरही तसाच टिकवून ठेवणारे श्री नवरे यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास “गड जिंकला पण सिंह हरला” असेच म्हणावे लागेल.