
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
निमगाव शहरामध्ये व आजूबाजूच्या परिसरात सुरु असलेले अवैध धंदे त्वरीत बंद करावेत यासाठी आज निमगाव केतकी शिवसेनेच्या वतीने इंदापुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
निमगाव केतकी मध्ये कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी अवैध धंदे त्वरीत बंद करावे, निमगाव शहरामध्ये दारू ,मटका ,जुगार, गांजा, ताडी अश्या अवैध धंद्यांमधे दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर पोलिस विभागाकडून नियंत्रण आणावेत. सदर अवैध धंदे करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक असल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास नागरिक धजावत नाहीत.
सदर गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे गावातील वातावरण खराब होत आहे, त्याचा त्रास विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्यासह व्यापरी वर्गाला होत आहे सदरील अवैध धंद्यांचा आपण तातडीने बंदोबस्त करावा आणि गावातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा,अन्यथा इंदापुर तालुका शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर महिला व पुरुष नागरीकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा इंदापूर तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सोमनाथ शेंडे यांनी सांगितले.
यावेळी रणजित बारवकर, महादेव कचरे, पांडुरंग सलगर, गणेश काळे तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.