
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन अनेक मित्र जोडणारे राजकीय क्षेत्रातील उगवते नेतृत्व असणारे दिपक पाटील कानवटे यांचा आज वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
दिपक पाटील कानवटे हे नाव लोहा शहर व तालुक्यात सर्व परिचित आहे. दिपक पाटील कानवटे यांनी लोहा येथील क्रिकेटचे मैदान आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने गाजविले तसेच क्रिकेट खेळता -खेळता त्यांनी अनेक मित्राची फळी तयार केली त्यांनी अनेक स्पर्धेचे आयोजन केले.
दिपक पाटील कानवटे यांना सामाजिक सेवेचा वसा त्यांचे वडील लोहा तालुक्यांचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे हजारो रुग्णांना बरे करणारे सुप्रसिद्ध डाॅ. डी. बी. कानवटे साहेब यांचा असुन दिपक पाटील कानवटे हे आपल्या मेडीकल चा व्यवसाय सांभाळून सामाजिक. क्षेत्रात ही त्यांनी शिव संकल्पन प्रतिष्ठान सेवा भावी संस्था स्थापन करून त्यांनी अनेक समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबविलेत अनेक गोरगरीबांना मदत केली. अनेक मित्रांच्या हाकेला धावून जाऊन त्यांना वेळोवेळी आर्थिक मदत करतात.मित्रांच्या सुख दुःख ला धावून जातात.
तसेच ते उद्योग क्षेत्रात ही त्यांनी पदार्पण केले आहे त्यांनी पारडी येथे आॅईल इंडस्ट्रीचा प्रकल्प हाती घेतला आहे त्यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला ही काम मिळणार आहे.
दिपक पाटील कानवटे हे नाव लोहा शहर व तालुक्यात सर्व परिचित झाले असून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आदी क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे सर्वांना मदत करणारे म्हणून ओळखले जातात त्यांनी त्यांचा उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक क्षेत्रा बरोबरच राजकीय क्षेत्रात ही पदार्पण करावे त्यांना चाहणारा वर्ग फार मोठ्या प्रमाणात असुन ते भविष्यात लोहयाच्या राजकारणात उतरतील अशी चर्चा जनतेतून होत असुन ते लोहा शहर व तालुक्यातील एक उगवते नेतृत्व असुन आज दिनांक २९ आॅगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस असुन ईश्वर त्यांना चांगले निरोगी व दिर्घ आयुष्य देवो त्यांच्या हातून नेहमी समाज सेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.
सचिन मुकादम चव्हाण
लोहा