
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड गोविंद पवार
श्री कृष्ण अष्टमी निमित्त लोहयात आज दिनांक २९ आॅगस्ट २०२२रोजी सायंकाळी ५.३० वाजता मोंढा मैदानात काँग्रेसच्या वतीने भव्य दहिहंडी महोत्सवाचे व स्वर मधुर ऑर्केस्ट्रा चे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई – ठाणे येथील प्रत्यक्ष दहिहंडी आपल्या भागातील लोकांना पाहता येत नाही म्हणून मुंबई ठाण्याच्या धर्तीवर लोहा वासियांच्या डोळ्याचे पारणे फिटावे त्यांना प्रत्यक्ष दहिहंडी पाहण्याचा आनंद मिळावा व तसेच स्वर मधुर ऑर्केस्ट्रच्या माध्यमातून एक से बढकर एक हिंदी मराठी गाण्यांची व डान्स बघण्याची मेजवानी मिळावी म्हणून प्रसिद्ध नृत्यांगना सिमा कुंभारे, प्रसिद्ध नृत्यांगना कु. रागिणी,झी टीव्ही फेम सिध्दार्थ खिल्लारे, यांच्या स्वर मधुर ऑर्केस्ट्रा चे ही आयोजन करण्यात आले आहे.
तसेच या भव्य दहिहंडी महोत्सवाला प्रमुख उपस्थिती माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत,आ. अमरनाथ राजूरकर,आ. मोहन अण्णा हंबर्डे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर सिने अभिनेते अनिल मोरे हे राहणार आहेत.
तसेच या दहिहंडी महोत्सवात भरमसाठ बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रथम बक्षीस ३११११ रुपये व चषक माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांच्या वतीने, दित्तीय बक्षीस २११११ रुपये व चषक नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण यांच्या वतीने, तिसरे बक्षीस १११११ रुपये व चषक जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले यांच्या वतीने ठेवण्यात आले असून तेव्हा या भव्य दहिहंडी महोत्सवात जास्तीत जास्त संघानी सहभागी व्हावे व सर्व नागरिकांनी दहिहंडी महोत्सव व ऑर्केस्ट्रा बघण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ, शहराध्यक्ष वसंत पवार,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शरद पाटील पवार, माजी न.पा. सभापती पंकज परिहार, युवक काँग्रेसचे नेते तथा कारेगावचे चेअरमन प्र. दत्ता पाटील दिघे, शिवाजी आंबेकर,उतम महाबळे , शरफौदीन शेख , आदींनी केले असून या भव्य दहिहंडी महोत्सवात नाव नोंदणी करण्यासाठी भूषण दमकोडवार मो. ९१७५५२५८२५, गजानन कळसकर मो.९८५०००७३९१, बालाजी कपाळे ९१५८१७५८७६, या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.