
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
बारुळ :- कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते अतिवृष्टी झाल्यामुळे अत्यंत खराब झाले असून त्याकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. गुत्तेदाराला वेळोवेळी सुचना, निवेदने देऊन देखील गुत्तेदार कोणालाही भीत नाही. आणि काम काही करत नाही सहा महिने झाले पुलाचे काम पूर्ण केले जात नाही म्हणजे जाणून बुजून दिरंगाई केली जात आहे. पुलाचे काम पूर्ण झाले असून फक्त भर भरणे बाकी आहे. भर भरल्यास पुलावरून वाहतूक करता येते. पण गुत्तेदार भर भरत नाही,पुलाच्या खालुन तात्पुरता तयार केलेला रस्ता प्रत्येक अतिवृष्टिच्या पावसासोबत वाहुन जात आहे. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमधून उतरुन रस्ता दुरूस्त करावा लागत आहे . मुखेड आगार प्रमुख साहेब, बस चालक, बस वाहक यांनी बस पावसाळ्यात सुद्धा चालू ठेवून प्रवाशांना आधार दिला. आणि आज स्वत चालक, वाहक, प्रवासी यांनी गाडी थांबवून रस्ता दुरूस्त केला आहे. असे किती दिवस रस्ता दुरूस्त करित बसमधून प्रवास करावा असे प्रवासी म्हणत होते. प्रशासनाने या पुलाकडे लक्ष देऊन गुत्तेदाराकडून काम करुन घ्यावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.