दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
====================
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे व शिवसेना जिल्हासंपर्क नेते श्री. विनोदजी घोसाळकर यांनी घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथील श्रीराम मंदिरात झालेल्या मुर्त्यांच्या चोरी संदर्भात सहसंपर्क प्रमुख श्री. शिवाजीराव चोथे, डॉ.हिकमत उढाण, जिल्हाप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर, श्री.ए.जे.बोराडे यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली. मंदिराचे पुजारी व समर्थ रामदास स्वामी यांच्या घराण्यातील 11 वे वंशज श्री.भूषण महारुद्र स्वामी यांच्यासह गावाकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधतांना विरोधी पक्षनेते श्री.अंबादास दानवे म्हणाले की, सदरील प्रकरण अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रातील लोकांच्या अत्यंत भावनेचा प्रश्न आहे. याप्रकारणी तपास यंत्रणांनी लवकरात लवकर शोध लावून आरोपीना गजाआड करावे. याप्रकारणी उच्च पातळीवर संपर्क करून तपासास गती दिली जाईल असे सांगून गावाकऱ्यांना धीर दिला.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, गावकरी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
====================
