
दैनिक चालू वार्ता आटपाडी प्रतिनिधी-दादासो वाक्षे
गोमेवाडी ता आटपाडी येथील ग्रामीण स्त्री शक्ती संस्थे मार्फत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते शालेय किट वाटपाचा कार्यक्रम इ. १ ली व ७ वी. च्या विद्यार्थ्यांना करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेने केले होते.
शालेय व्यवस्थापन समिती व शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनीही सहकार्य केले. बाळेवाडी परिसरातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत शेतकरी व शेती सहाय्यक महिलांच्या मुलांना शालेय किट वाटप केले.
संस्था गेले ३-४ वर्षे गोमेवाडी परिसरातील मुलांसाठी हा उपक्रम “सेवा सहयोग” या संस्थे मार्फत राबवित आहे. याही वर्षी संस्थेने आसपासच्या परिसरातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शालेय जवळपास 300 किट चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बाळेवाडी परिसरातील ग्रामस्थ, पालक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्थे च्या कामाचे कौतुक सर्व ग्रामस्थांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गोरगरिबांच्या मुलांच्या शालेय अडचणी समजून घेऊन त्यांना मदतीचा हात पुढे केल्या बद्दल संस्थेचे आभार मानले. निस्वार्थ पणे व आपला वेळ देऊन महिलांसाठी महिला कार्यरत आहेत, व तालुक्यातील पहिलीच महिला संस्था असल्याचे सांगून याचे विशेषतः कौतुक केले. स्वतः मी पूर्ण पणे आपल्या ला सहकार्य करेन,आपल्या पाठीशी राहील.
राज्यातील सर्व शाळा डिजिटलायझेशन होण्यासाठी आपला आमदार फंड या वर्षी चा पूर्ण पणे दिला आहे. असे सांगितले. यानिमित्ताने आटपाडी तालुक्यातील १८८ शाळा डिजिटल होणार आहेत असे बोलले.त्या परिपूर्ण करणार आहे.
शाळेच्या गजीनृत्य पथकाचे व त्याची कल्पना सुचलेल्या शिक्षका नदाफ व थोरात मॅडम यांचे ही कौतुक केले. या च कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले त्या बद्दल संस्थे चे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समिती चे BRC चे डाटा ऑपरेटर चंदनशिवे, शिक्षक बॅकेचे संजय खरमाटे,केंद्र प्रमुखअर्जुन विभुते, मुख्याध्यापक सिराज तांबोळी व सहकारी शिक्षक, बाळेवाडी चे सरपंच गणपत खरात, व्यवस्थापन समिती चे ईश्वर पुकळे, संस्थे च्या सहकारी जिजा आवळे, स्मिता पोफळे, सविता जवळे, अर्चना जगताप, मनिषा देशपांडे,गायत्री कुलकर्णी,अध्यक्षा सुनेत्रा कुलकर्णी. उपस्थित होत्या.