
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
***************
काळानुरुप जो बदलतो तोच आज टिकतो.काही जुन्या परंपरा आजही उपयोगी आहेत.अगोदर गणपती उत्सव आला की घरातली वडीलधारी मंडळी नदी काठच्या गाळाच्या मातीपासुन गणपती बनवायचे.यातुन जणु येणा-या नवा पिढीला नकळत कलेचे धडे घरातुन दिले जायचे.ते आज घडत नाही म्हणून पर्यावरण पूरक गणपती ही आजकाल काळाची गरज झालेली आहे.याचं भान आणि जान राखून श्री शिवशंकर विद्यालय वन्नाळी ता.देगलूर येथील कलाध्यापक,बालाजी पेटेकर यांनी बॉम्बे माती पासून पर्यावरण पूरक अशी गणपती बनवली.विद्यार्थ्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किंवा केमिकल युक्त रंगाचा वापर करून पर्यावरणाला हानिकारक अशा गणपती बनवुन वापरण्यापेक्षा बॉम्बे माती,शाडूच्या माती पासून किंवा कागदाच्या लगद्यापासून जर अशाप्रकारे गणपती बनवले तर ते पर्यावरणाला पूरक असतील अशा मुर्ती बनवतांना विद्यार्थ्यांना एक वेगळाच आनंद मिळतो आणि उद्या येणाऱ्या भावी पिढ्यांना कलेमध्ये आपलं भवितव्य घडवणारा कलावंत म्हणून मूर्तिकार म्हणून जो पुढे येऊ पाहते त्यांच्या हातांना एक चांगल्या प्रकारे काम मिळेल आणि आपल्या देशामध्ये एक चांगल्या प्रकारचे मूर्तिकार ह्या निमित्ताने तयार होतील आणि ते आपल्या कृतीतून कलाध्यापक,बालाजी पेटेकर यांनी दाखवून दिले आहे. ते यापूर्वी साबना पासुन 35 मुर्त्या त्यांनी बनवल्या.ते खडू पासून ही मुर्ती बनवलेले आहेत.एक मनस्वी चित्रकार म्हणून वर्गामध्ये व इतर अनेक ठिकाणी माती पासून मुर्त्या बनवण्याच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन त्यांनी केलेले आहे.या कार्यशाळातून उद्याचे भावी मूर्तिकार निर्माण होतील अशी असा त्यांचा विश्वास आहे. आमचे पत्रकार प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क साधले असता गणेचतुर्थी पुर्वी एका महिन्यापासून जर अशा कलावंताकडे त्यांनी मूर्त्या सोपवायचं काम दिले तर एक चांगले का कलाकारांच्या हाताने काम मिळेल आणि एक पर्यावरण पूरक गणपती बनवता येईल असे ते म्हणाले परंतु आजकाल वेळ कोणाकडे आहे झटकन गेले पटकन पैसे दिले आणि गणपती आणली. भलेही विसर्जनांच्या नंतर काही होऊ द्या. गणपतीचे परंतु वेळेअभावी ही माणसं,आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीकडे वळतोय हे दुर्दैवाने येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे असं ते म्हणतात.त्यांच्या या समाजपयोगी उपक्रमास अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यापुढेही सामाजिक संघटनांनी नवयुवक समाजसेवकांनी त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकानी एक गाव एक गणपती असे चांगल्या संकल्पनेतून बनवले तर एक चांगल्या प्रकारे सामाजिक ॠणं फेडण्याचं काम होईल असं ते म्हणाले…
त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा सामाजिक संघटनानी चालवायला हवा…