
दैनिक चालु वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी-माणिक सूर्यवंशी.
खानापूर सर्कल. मोजे चैनपुर येथे दिनांक. 31 ऑगस्ट 2022 बुधवार रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक .१० वाजता या. प्रदीप वाघमारे सरपंच चैनपूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष.मा मच्छिंद्र गवाले(मा.ह. अभियान मराठवाडा अध्यक्ष) शीतलताई आंतापुरकर आमदार देगलूर बिलोरी मतदार संघ. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते. मा. कैलास येसगे कावलगावकर(सामाजिक कार्यकर्ते) प्रा.भीमराव दिपके सिंधू महाविद्यालय देगलूर). या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, डॉ. मिलिंद शिकारे, मा.सुभाष आल्लापूरकर(सामाजिक कार्यकर्ते) मा.गंगाधर भुयारे(या.ह.अभियान तालुकाध्यक्ष देगलुर)मा. संजय गवलवाड (सेवा दल काँग्रेस तालुकाध्यक्ष देगलूर) या.सायलू भंडारे (उपसरपंच चैनपुर) मा. जोंधळे (ग्रामसेवक चैनपुर) मा. गंगाधर हेडे(मा. तंटामुक्ती अध्यक्ष चैनपू र) मा. सिद्धार्थ ढवळे,मा. माणिक पाटील, मा. चांद साब हुसेनसाब (ग्रामपंचायत सदस्य चैनपुर) मा.गंगाधर ईबितवार, ग्रामपंचायत सदस्य. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते. कैलास येसगे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या विचार आपण घेऊन शैक्षणिक दृष्ट्या उंच झेप घेऊन मातंग समाजातील सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश घ्यावे असे प्रतिपादन त्यांनी केले. तर दुसरे, प्रमुख वक्ते प्रा. भीमराव दिपके म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांची जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी झाली पाहिजे, तसेच अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असलेल्या समाज निर्माण करण्यासाठी बहुजन समाजातील सर्व एकत्र आले पाहिजे, तसेच अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत जाऊन या देशातील अंधश्रद्धा दरिद्री व तसेच गुलामगिरीत चाललेल्या माणसाला वर उचलण्याचा काम त्यांनी आपल्या साहित्यातून निर्माण केलं त्यासाठी आपण सर्वजण अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. असे प्रतिपादन दिपके सर यांनी प्रतिपादन केले. तर यावेळी प्रमुखा पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी सुद्धा देखील अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरप्रकाश टाकले. या कार्यक्रमाचे सुरेख अस सूत्रसंचालन मा. देविदास शंकरराव पोतंगले. यांनी केले तर.
प्रमुख पाहुणे ,प्रमुख मार्गदर्शक, प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आला, या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन बालाजी गवलवाड यांनी केले. जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रकाश गवलवाड ,राजू गवलवाड, विजय गवलवाड, अजित गवलवाड, रामचंद्र गवलवाड, शिवाजी तोटरे
गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती व सर्व समाज बांधव यावेळी उपस्थित होते.