दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करताना संभाजी ब्रिगेड मागील काही वर्षांपासून राजकीय पर्याय म्हणून उभी राहिली आहे. त्यात शिंदे गटामुळे शिवसेनेला पडलेली खिंडार भरून काढण्यासाठी आता शिवसेनेने संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. तसेच आगाम सर्वच निवडणुका सोबत लढणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे आता आगामी ये नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गणितं देखील बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपंचायतीमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. त्यात अनेक ठिकाणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा महत्वपूर्ण वाटा आहे. भविष्यात राजकीय पर्याय उपलब्ध करूनदेण्यासाठी संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत जाणे पसंत केले. त्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. त्यामुळे भविष्यात स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी झाली तर संभाजी ब्रिगेडला ही संधी मिळेल. दरम्यान, नांदेड जिल्हा परिषदेत सर्वाधिक २८ सदस्य काँग्रेसचे होते. त्याचबरोबर शिवसेनेचे १०, भाजपच १३, राष्ट्रवादी- १०, रासप आणि अपक्ष प्रत्येकी एव असे एकूण ६३ सदस्य होते.चळवळीतून अनेक गावांत परिवर्तन संभाजी ब्रिगेडने सामाजिक संघटना म्हणून काम करत असताना गावा-गावात परिवर्तन घडवून आणण्यासाठी वैचारिक चळवळ उभी केली. आजही बहुतांश गावात संभाजी ब्रिगेडने रूजविलेल्या विचारांचा पगडा पहायला मिळत आहे. त्यात जिजाऊ ब्रिगेडचा देख महत्वपूर्ण वाटा आहे. दरम्यान, राजकीय पर्याय म्ह संभाजी ब्रिगेडची घोषणा केल्यानंतर इतर पक्षातील तर शिवराज्य पक्ष असताना संभाजी ब्रिगेडला राज पक्ष म्हणून घोषित केल्याने अनेकांनी संघटनेला राम देखील ठोकला होता. वैचारिक बैठक झालेल्या कार्यकर्त्यांच्या मनात आजही मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांनी दिलेले विचार कायम असल्याचे दिसून येते.संभाजी ब्रिगेडने अनेकांना घडविले
संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक आंदोलनामध्ये नांदेडचा मोठा वाटा आहे. ब्रिगेडचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना चांदोजी सूर्यवंशी, माधव पावडे, विठ्ठल पावडे, संतोष गव्हाणे, धनंजय सूर्यवंशी यांनी गावा गावात कार्यकर्त्यांची वैचारिक फळी निर्माण केली. त्यामुळे नांदेड उत्तर आणि अर्धापूर तालुक्यातील बहुतांश गावात संभाजी ब्रिगेडचे राजकीय वर्चस्व अ सिद्ध झाले आहे.
घरवापसीसाठी प्रयत्न करणे गरजेचे
कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मजल मारून अनेकजण इतर राजकीय पक्षांची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. त्यामुळे मुळ संभाजी ब्रिगेडचे विचार डक्यात ठेवून इतर पक्षात काम करणाऱ्यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी प्रयत्न होणेही गरजेचे आहे.
