
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- सिंदफळ ता तुळजापुर येथे सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी भुम येथे मा.पोलीस निरीक्षक भुम याच्या मार्फ़त मा. पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांना निवेदन करण्यात आली आहे.मौजै सिंदफळ ता तुळजापुर येथे सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार हा घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असुन तुळजापुर तालुक्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यसाठी व तसेच महाराष्ट्रासाठी घृणास्पद व लज्जास्पद असुन सिंदफळ येथिल 6 वर्षाची मुलगी ही मंगळवारी सकाळी आपल्या घराबाहेर खेळत होती. त्यावेळी या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर निर्दयीपणे लैंगिक अत्याचार केला.त्यानंतर ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली त्या मुलीला तातडीने तुळजापुर येथिल शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सदरील आरोपी पुर्वीपासुन गुन्हेगारीवृत्तीचा असुन याच्या अगोदर त्याने असे अनेक प्रकार केले असुन अशा अरोपीस कायमचा बंदोबस्त होण्याकरिता प्रशासनाने त्याचा खटला जलदगती न्यायालयात चालवुन त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी व कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.
असे निवेदन भुम तालुका व शहर मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले. निवेदनावर आसिफ भाई जमादार, आलीम शेख, कदीर भाई शेख, फिरोज शेख, अज्जूभाई जमादार, आसिफ मुजावर,
प्रभाकर भोसले, जमीर मोगल, विनोद वाघमारे, राजु शेख, असलम बागवान, सैफ मनियार, पैलवान आकलेस जमादार आदींच्या सहया आहेत.