
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी
बेल्हे – समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे ता.जुन्नर जि.पुणे येथे ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त, मेकॅनिकल इंजिनियरिंग स्टुडंट्स असोसिएशन डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून रणजित पवार (लेखक ,कवी तथा संस्थापक /कार्याध्यक्ष ,संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्ट राज्य ओतूर,पुणे ) ,हभप.अर्चनाताई नेवकर(प्रसिद्ध भागवताचार्या ,नारायणगाव तथा राज्यसहसचिव ,संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य) आणि हेमंत नेवकर (प्रसिद्ध उद्योजक नारायणगाव ) उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या उत्कृष्ट परिक्षणातून वक्तृत्व स्पर्धेचे निकाल त्याचवेळी जाहीर करून प्रथम येणाऱ्या खालील तीन विद्यार्थ्यांचा पुस्तक,पेन आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये अनुक्रमे, चि.तेजस खिलारी(प्रथम), कु.साक्षी भोर (द्वितीय) आणि कु.गीता उबाळे (तृतीय) .
यावेळी रणजित पवार आणि अर्चना नेवकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा.अनिल कपिले (प्राचार्य), प्रा.संजय कंधारे(उपप्राचार्य) यांची होती .तर प्रा.महेंद्र खटाटे (विभागप्रमुख मेकॅनिकल), प्रा.शाम फुलपगारे(विभागप्रमुख मेकाट्रॉनिक्स), प्रा.नंदकिशोर मुर्हेकर (वर्कशॉप सुप्रीटेंडेट), प्रा.संदीप त्रिभुवन ,प्रा.ईश्वर कोरडे, प्रा.हुसेन मोमिन, प्रा.ज्ञानेश्वर दसपुते, आणि शिक्षकेत्तर कर्मचारी इम्तियाज मुजावर, मुजम्मील शेख, अजीज जमादार आणि हांडे मामा उपस्थित होते.
या वक्तृत्व स्पर्धेचे प्रास्ताविक व नियोजन प्रा.सौरभ नवले (राज्यसहसंघटक ,संत गाडगे महाराज विचारमंच महाराष्ट्र राज्य),सूत्रसंचालन कु.वैष्णवी पोटे, कु.सिद्धी डुंबरे तर आभार प्रा.अनिल कपिले(प्राचार्य) यांनी मानले.