
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यात अंजनीग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनगाव सुर्जी येथे श्रीक्षेत्र देवनाथ मठाचे मठाधिपती प.पू.जितेंद्रनाथ महाराज यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे शहरातील सर्व मंदीरांची साफ-सफाई,वृक्षारोपण करण्यात आले करीता गावकरी मंडळींनी खुप मोठा प्रतिसाद दिला.यावेळी भव्य रक्तदान शिबिरही राबविण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला ९१ रक्तदात्यांनी रक्तदान केले असे रक्त संकलन अधिकारी डॉ.अनिल कविमंडल यांनी सांगितले.या शिबिराला संत गाडगेबाबा ब्लड बँक,बडनेरा यांचे फार मोठे योगदान लाभले.
मठाधिपती प.पू.जितेंद्रनाथ महाराज यावेळी म्हणाले की,एकनाथ महाराज व दौलताबाद च्या किल्ल्यावरील जनार्धन स्वामींची ६०० वर्षांपूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा म्हणून अंजनगाव सुर्जी शहरातील १६० मंदिरांचे सर्वेक्षण तसेच स्वच्छता अभियान राबविण्यात
आले.संत तुकडोजी महाराजांना जे अपेक्षित होते ते अंमलात आणून मठ-मंदिर यांच्या माध्यमातून अध्यातमातून परमार्थ समवेत मुल्य-सिद्धांत-मानवता याचा सुद्धा प्रचार-प्रसार झाला पाहिजे यासाठी स्पृश्य-अस्पृश्यता,जात-पात,धर्म-पंथ,उच्च-निच्चता ह्या सर्व गोष्टी समाप्त झाल्या पाहिजे.भेदांना विसरून सर्व समाजाने एकत्र येऊन भारत देशाच्या सामर्थ्यवान अस्तित्वाकरिता देवस्थानापासून-शिक्षास्थानापर्यंत,समाजस्थानापासून-राजकीयस्थानापर्यंत देव-देश-धर्मासाठी सर्व एकत्र आले तर भारत हा विश्वगुरु म्हणून या संपुर्ण जगात विख्यात होईल.त्याचाच काम श्रीक्षेत्र देवनाथ मठांतून होत असते असे यावेळी प.पू.जितेंद्रनाथ महाराज म्हणाले.