
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : वसमत रोड, एमआयडीसी कॉर्नर परिसरात कार्यरत ‘श्रीहरि नवयुवक एकता गणेश मंडळा’तर्फे भाविक-भक्तांसाठी महाप्रसाद व सुग्रास अशा महाभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
परभणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ.राहूल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो भाविक भक्तांनी महाप्रसाद व भोजनाचा आस्वाद घेतला. शहरातील अनेक उद्योजक, व्यापारी, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक व चाहते मंडळींनी उपस्थिती लावून सदर भोजन समारोहाची अतूल्य अशी शोभा वाढवली.
मागील २८ वर्षांची धार्मिक व सामाजिक परंपरा असलेल्या श्रीहरि नवयुवक एकता गणेश मंडळातर्फे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भाविक भक्त व हितचिंतकांचा भक्तीभावाने मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय असाच असतो. उद्योजक त्र्यंबक राव दशरथराव मोहिते-पाटील, पंडितराव मोहिते-पाटील व उद्धवराव मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पाडला जाणाऱ्या या समारोहाला असंख्य भाविक-भक्त, हितचिंतक व मित्र मंडळींचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असतो त्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला जातो.