
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
उद्धवजी ठाकरे हेच देशातील सर्वात लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून WHO,ने नोंद घेतली– वरूण सरदेसाई
खोक्याच्या अमिषाशाला बळी पडून गद्दारी केलेल्या लोकप्रतिनिधींविषयी सामान्य नागरिक, जेष्ठ व निष्ठावंत शिवसैनिकांत प्रचंड राग आहे. निष्ठावंताच्या ताकदीसमोर शिवसेनेचे कुणीही वाकडे करू शकणार नाही. केवळ आमदार, खासदार गेले असले तरी सर्वसामान्य शिवसैनिक व नागरिकांची ताकद शिवसेनेसोबत आहे, हीच ताकद येणाऱ्या निवडणूकीत गद्दारांना चपराक लगावल्याशिवाय राहणार नाही, असा टोला गद्दारांना युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील तुळजापूर पासून सुरूवात झालेले युवा सेनेचे निर्धार अभियान झंझावाती दौऱ्याच्या निमित्ताने सेनेचे सचिव वरूण सरदेसाई लोहा येथे शाखा स्थापन व भव्य दिव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपिठावर प्रमुख मार्गदर्शक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण,अक्षय ढवळे युवा सेना विस्तारक, शरदजी कोळी राज्य विस्तारक, गीता कदम युवती विस्तारक, प्रमुख पाहुणे भुजंगराव पाटील डक माजी जिल्हाप्रमुख,गजानन कदम युवा सेना जिल्हाप्रमुख,महेश खेडकर, वत्सलाताई पुयड माजी जि प सदस्या, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रसिद्ध व्यापारी शेषरावजी कहाळेकर,नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नवनाथ (बापू) चव्हाण, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,चंद्रकांत कोंडावार,भीमराव पाटील शिंदे,कैलास कहाळेकर,शहराध्यक्ष महेश पाटील चव्हाण, बालाजी गाडेकर,धनंजय बोरगांवकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई म्हणाले,कि”गेली दोन वर्षे महाराष्ट्रात देशात,जगावर कोरोनाचे सावट असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगले काम केले असून देशातील सर्वात लोकप्रिय प्रतिनिधी म्हणून WHO सारख्या जागतिक संघटनेने,वेगवेगळ्या मिडियाच्या माध्यमातून नोंद घेतलेली आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होत होता केवळ एक कट्टर हिंदुत्ववादी पक्षाचा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हा प्रमुख नेता बनतो त्याला पाठिंबा दोन सेक्युलर पक्ष देतात.गेल्या अडीच वर्षात 36 जिल्ह्यात एकही घटना घडल्याची कानावर आली नाही,सामाजिक सलोखा बिघडला नाही, दंगली पेटल्या नाहीत,जाती जातीत ताण तणाव निर्माण झाला नाही.ठाकरे सरकारने अतिशय चांगले काम केले. जर उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता अशीच वाढत गेली तर महाविकास आघाडीचा प्रयोग असाच यशस्वी झाला तर इतर राज्यातही सेक्युलर धर्मनिरपेक्ष पक्ष आशेचा किरण म्हणून २०२४ ला पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याकरिता उद्धवजी ठाकरे पुढे येतील या भीतीमुळे भाजप आणि शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या ऑफर, कुणाला धाक, धमकी देत पक्ष फोडला. महाराष्ट्रात आज पर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले परंतु उद्धवजी ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलं त्यावेळी तमाम शिवसैनिकांचे डोळ्यात पाणी होतं, महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेला वाईट वाटलं डोळे पाणावले.
लोह्यासारखीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असून सामान्य जनता आपल्या पाठीशी असून ज्या दिवशी निवडणूक जाहीर होईल त्यादिवशी सामान्य जनतेला उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना दिसेल.मुंबई महापालिका हातातून गेली तर महाराष्ट्र धोक्यात येईल. हे भाजपाचे षड्यंत्र आपल्या सर्वांना हाणून पाडायचे असल्याचेही ते म्हणाले.
लोहा कंधारच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोहिदासजी चव्हाण साहेबांच्या,नवनाथ (बापू)चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज लोहा येथे ओपन केलेल्या शाखेमार्फत यापुढे गावोगावी, गल्लोगल्ली फलकाचे अनावरण करून प्रत्येक सर्व युवकांपर्यंत पोहचून मागील पुनरावृत्ती घडविण्याचे उपस्थितांना संबोधित केले.
प्रथमतः सायंकाळी लोहा शहरातून भव्य वाहन व मोटार सायकल रॅली काढून फटाक्यांची अतिशबाजी करत वरूण सरदेसाई यांचे भव्य स्वागत केले. युवा सेनेच्या तीन शाखांचा अनावरण सोहळा पार पडला.नंतर लोह्याच्या परंपरेनुसार खारीक खोबऱ्याचा हार घालून भव्य स्वागत केले. तसेच यावेळी भुजंगराव पाटील डक, नवनाथ (बापू) चव्हाण, गजानन कदम यांचेही मनोगत पर,समाज प्रबोधनात्मक पक्षहिताची भाषणे झाली. सदरील कार्यक्रमाचे अतिशय मोजक्या व सुंदर शब्दात प्रास्ताविक प्रभाकर पाटील पवार यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.संतोष गायकवाड यांनी तर आभार महेश पाटील यांनी मानले.यावेळी धुराजी नावंदे,धोंडु किलजे, निरंजन वाघमारे,आप्पाराव पाटील,जुना लोहा येथील सतीश मुकदम,शरद चव्हाण,पंकज चव्हाण,दिपक चव्हाण, विलास कहाळेकर, नागेश सेवडकर, कैलास डुबुकवाड, संदीप कहाळेकर, मारोती पंदलवाड,कृष्णा पंदलवाड,धोंडिबा सेवडकर,लोहा शहरातील असंख्य शिवसैनिक, युवा सैनिक, पदाधिकारी महिला,युवक व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक आदींची उपस्थिती होती.
युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या झंजावाती दौऱ्यात युवा सैनिकांशी संवाद साधत लोह्यातील चव्हाण गल्ली, भोई गल्ली, नवी आबादी या तीन शाखांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. येणाऱ्या काळात शिवसेना-युवा सेना लोहा कंधार मतदार संघात तळागाळापर्यंत पोहोचविणार व शिवसेनेचा भगवा मतदारसंघात फडकवणार-
नवनाथ (बापू) चव्हाण.