
दैनिक चालु वार्ता नांदेड उपसंपादक – गोविंद पवार
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रोहिदास चव्हाण आपल्या मनोगतात उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिवसेना स्थापने पासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे सुत्र घेऊन शिवसेनेची स्थापना केली.माझ्यासारखा सर्वसाधारण शेतकऱ्यांचा मुलगा १९८६ पासूनचा शिवसैनिक म्हणून शिवसेनेत प्रथम जिल्हाप्रमुख पदाच्या कार्यकाळात तब्बल ९५० शाखा स्थापन करून माझ्या कार्यकाळात नांदेड जिल्ह्यातून शिवसेनेचे पाच आमदार निवडून दिले.माझ्या हाताखालून गेलेले विविध पक्षात आमदार,जि.प.सदस्य,अध्यक्ष विविध पदावर गेले.शिवसेनेनी रिक्षेवाले,टांगे वाले,शेतकरी, पानपट्टीवाले,वाचमन,अनेकांना आमदार,मंत्री केले.ईडीच्या भितीने, अपेक्षेने पदांसाठी अनेकांनी शिवसेनेला गद्दारी करत बाजूला गेले. राष्ट्रवादी व काँग्रेसची शिवसेनेला भीती नसून त्यांना पूर्ण उरलेली असून पक्ष विकलेल्या अनेक गद्दारांचा चव्हाणांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी म्हणाले हिंगोलीचा खा हेमंत पाटील हा निवडणुकीच्या तोंडावर मॅनेज होणारा गद्दार होता व तो शेवटी पण गद्दार झाला जनता त्यांना येणाऱ्या काळात धडा शिकवेल असा टोला यावेळी त्यांनी लगावा , नांदेड उत्तरचा आ बालाजी कल्याणकर ५० खोक्यासाठी लाचार होऊन पक्षाशी बेईमान झाला असेही यावेळी म्हणाले.
शिवसेनेच्या बोटाला धरून महाराष्ट्रात आलेल्या भाजपाच्या मोदी,शहा, नड्डा, फडवणीस यांच्या वर शरसंधान साधले.