
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:- राम चिंतलवाड
परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीची बैठक आज रोजी देवस्थान कमिटीचेअध्यक्ष तथा तहसीलदार डी. एन.गायकवाड यांच्याअध्यक्षतेखाली बैठक होऊन देवस्थान कमिटीमध्ये रिक्त झालेल्या पदावर एकूण तीन नवीन संचालक पदाची नियुक्ती सन्माननीय सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने निवड करण्यातआलीआहे. या नवीन संचालकपदी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा भावी नगरसेवक संजय माने,जेष्ठ शिवसैनिक विलास वानखेडे,गजानन मुत्तलवाड या तिघांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी देवस्थान कमिटीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव शक्करगे,उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ,अनंता देवकते,एडवोकेट दिलिपभिया राठोड यांच्यासहअनेक संचालक हजर होते.या निवडीमुळे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर,माजी जिल्हा परिषद सुभाष आल्ला राठोड,माजी तालुका अध्यक्ष जनार्दन ताडेवाड,शेख रफीकसेठ यांच्यासह तालुका व शहरातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणातअभिनंदन करुन फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यातआला आहे.