
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सध्या सराईत गुन्हेगारांनी चांगलीच डोके वर काढले आहे. मात्र जिल्हा पोलीस प्रशासन सुद्धा सराईत गुन्हेगारांच्या जागीच मुसक्या अवळत असल्यांचे दिसून येत आहे. अशीच एक कारवाई फलटण ग्रामीण पोलिसांनी गणेश विसर्जनाचा २४ तासांचा बंदोबस्त करुन क्षणाची विश्रांती न घेता पडत्या मुसळधार पावसांत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीमधील धुमाळवाडी गावच्या हद्दीमध्ये पुराच्या पाण्यांतून जीवाची परवा न करता आरोपींचा पाठलाग करुन सराईत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यांमध्ये श्रेयस उत्तम नाळे रा. तुधेबावी ता.फलटण) अमित विठ्ठल हुंबे रा.धुमाळवाडी ता. फलटण) गणेश अरुण जगदाळे रा. मोरागळे ता.माण जि.सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन मोटरसायकली तसेच शेतीसाठी औषध फवारणीसाठी वापरण्यांत येणारा विद्युत पंप ०१ तर मोटर सायकल ०९ चोरीच्या असा एकूण ७.४५.०००/रुपये किंमतीचा मुद्देमाल फलटण ग्रामीण पोलिसांनी हस्तगत केला असुन.या प्रकरणी तीनजणांना अटक करण्यांत आले आहे. तसेच आरोपींचा पाठलाग करीत असताना पोलीस नाईक कर्मचारी काशीद हे किरकोळ जखमी झाले असतानाही मनोधैर्य खेचून देता पाठलाग करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांच्यावर फलटण तालुक्यांसह मुंबई,पुणे ,खेड शिवापूर शिरवळ ,इंदापूर या ठिकाणाहून चोरलेल्या एकूण ०९ मोटरसायकलीवर शेतीसाठी औषधे फवारणीसाठी लागणारे एच.टी.पी पंप ०१ अशी त्यांनी गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. तसेच त्यांच्याकडूंन अनेक गुन्हे उघडकीस शक्यता आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरर्डे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.