
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी रत्नागिरी-संभाजी गोसावी
जिल्ह्यांमध्ये गेले दहा दिवसांपासुन बेपत्ता असलेल्या रत्नागिरीच्या पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा पतीनेच खून केल्यांचे पोलीस तपासांमध्ये पुढे आले आहे. या घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तिचा पती आणि शिवसेना उप.तालुका प्रमुख सुकांत गजानन सावंत (वय ४७ रा. सडामिऱ्या रत्नागिरी) चुलत भाऊ रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत वय ४३ सडामिऱ्या रत्नागिरी) आणि कामगार प्रमोद बाबू गावगणं (वय ३३ रा. गृहागर) या तिघांना रविवारी अटक करण्यांत आली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन स्वप्नाली सावंत या १ सप्टेंबर पासून बेपत्ता असल्यांची तक्रार पतीनेच रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यांत दाखल केली होती. दरम्यान स्वप्नाली सावंत यांची आई (संगीता कृष्णा शिर्के रा. तरवळ जाकादेवी) यांना मुलीचा खून झाल्यांची तक्रार १० सप्टेंबर रोजी दिली त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासांची चक्रे गतिमान करीत. या प्रकरणाचा छडा लावण्यांस सुरुवांत केली. पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांच्या पतीला चौकशीसाठी ताब्यांत घेतले असता त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी करीत असताना खून केल्यांची कबुली सुकांतने पोलिसांना दिली.