
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
मुंबई: सध्या महाराष्ट्रांत नवीन सरकारची निर्मिती झाल्यापासून जनतेला चांगलाच दिलासा मिळत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये महत्त्वांचे तीन निर्णय घेतल्यामुळे जनतेला या निर्णयातून चांगला दिलासा मिळाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमिंत्त ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बस मधून आता मोफत प्रवास करता येणार आहे अशी घोषणा मा. मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचारी ७५ वर्ष पूर्ण केलेल्यांना व ज्येष्ठ नागरिकांना नागरिक तसेच गोविंदा पथकांतील गोविंदांबाबत महत्त्वांचे निर्णय काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत यापूर्वी नागरिकांना मोफत प्रवास करताना फक्त ५०./.टक्के सवलत दिली जात होती. परंतु आता यापुढे जे जेष्ठ नागरिक स्त्री किंवा पुरुष १५ ऑगस्ट रोजी ७५ वर्ष किंवा त्यावरील असतील तर त्यांना आता एसटीचा प्रवास मोफत असणार आहे.