
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी-
म्हसळा / रायगड :
========================
आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 वार रविवार रोजी बहुउद्देशीय सभागृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे संविधान सुरक्षा आंदोलन कोकण विभागीय परिषद माजी खासदार मौलाना उबेदुल्लाह अझमी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
=========================
परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे, माजी खासदार हुसेन दलवाई, राजरत्न आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे आयोजन हबीब फकी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले, यावेळी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,ठाणे, पालघर मुंबई नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून असंख्य संविधान प्रेमी आणि अभ्यासक उपस्थित होते. याच कार्यक्रमामध्ये नूरखान पठाण लिखित ‘आपले संविधान राज्यपद्धती नव्हे जीवनपद्धती: या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक महा अनिसचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांनी केले.
यावेळी सर्वच मान्यवरांनी आता आपण जातीच्या आणि धर्माच्या चौकटीतून बाहेर पडून फक्त भारतीय म्हणून जगण्याची आणि संविधान वाचवण्याची गरज निर्माण झाली आहे संविधानातील समता,स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्य दररोजच्या जगण्यात उतरवण्याची गरज निर्माण झाली आहे. संविधानिक मूल्याची होत असणारी तोडमोड थांबवण्यासाठी सर्वांनीच सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे आणि म्हणून कोकणामधून सुरू झालेली परिषद राज्यभर आणि देशभर घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. 2024 नंतर कदाचित आपण काहीच करू शकणार नाही म्हणून आता आहे त्या सर्व शस्त्रांनिशी आणि साधन सामग्रीनिशी संविधानिक मार्गाने सर्वांनी संविधान वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे असे आवाहन हमीद दलवाई यांनी केले. सद्याच्या परिस्थितीत संविधानिक मूल्य कशी नाकारले जात आहेत हे मा.प्रा. सुषमा अंधारे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सर्वांसमोर मांडले. तर मा. राजरत्न आंबेडकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताची प्रतिमा आणि सद्याचे देशातील वातावरण यावर परखड मत व्यक्त केले.
परिषदेत अरिफ करंबेळकर सिकंदर जस नाईक इरफान शहा ओसामा पुरकर शकील अहमद कडू विलास पवार सैफुल्ला फिरे बशीर करेल इक्बाल देशमुख डॉक्टर जमाल कुरुड कर अखिल बगदादी मुस्ताक मिरकर अब्दुर्रहीम सय्यदी अखील बगदादी, रवींद्र चव्हाण विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.