
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
हिंदू आणि मुस्लिम धर्मीय एकोप्याचे दर्शन
जव्हार:- ऐतिहासिक जव्हार शहराला संस्थानाची पार्श्वभूमी लाभलेली आहे.पालघर जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणूनही जव्हारचा गौवरवाने उल्लेख केला जातो.राजाश्रय लाभलेल्या या शहराला चांगल्या रूढी व परंपरा अनेक काळापासून आजही चालू आहेत.जव्हारच्या मुकणे राजघराण्याचे राजगुरू असलेले श्री सदानंद महाराज व औलिया सदरोद्दिन बदरोद्दीन चिस्ती यांचा ५७० वा शाही उरूस गेल्या दोन वर्षे कोविड-१९ जागतिक महामारीच्या संकटामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साजरा केला केला.मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच १६ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान हा शाही उरुस साजरा केला जाणार आहे.
५७० वर्षाची परंपरा असणाऱ्या या जव्हार मधील उरुसाला हिंदू आणि मुस्लिम धर्मीय बांधव एकोप्याने सहभागी होतात.भाद्रपद महिन्यात सप्तमी,अष्टमी व नवमी या तीन दिवसात या उरुसाचे आयोजन केले जाते.